Join us

RBI चा ग्रामीण बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! इंटरनेट बँकिंग नियम शिथिल करण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 17:22 IST

जर तुमचे बँक खाते ग्रामीण भागातील बँकांमध्ये असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डेव्हलपमेंट आणि रेग्युलेटरी पॉलिसीमध्ये ग्रामीण बँकांसाठीचे नियम शिथील केले आहेत.

नवी दिल्ली : जर तुमचे बँक खाते ग्रामीण भागातील बँकांमध्ये असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डेव्हलपमेंट आणि रेग्युलेटरी पॉलिसीमध्ये ग्रामीण बँकांसाठीचे नियम शिथील केले आहेत. ग्रामीण बँकांच्या ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंगचे नियम शिथील करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

या संदर्भात आरबीआयने एक अहवाल सादर केला आहे. "RBI ला काही आर्थिक आणि बिना आर्थिकचे नियम पूर्ण केल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीने त्यांच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग सुविधा प्रदान करण्याची परवानगी आहे.ग्रामीण क्षेत्रात डिजिटल बँकिंगचा प्रसार करण्यासाठी आरबीआयने इंटरनेट बँकिंग प्रदान करण्यासाठी पात्र होण्यासाठी नियम शिथिल करण्यात येत असल्याचे आरोबीआयने म्हटले आहे.

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीत गुंतवणूक करताय? मग आधी ही बातमी वाचा...

आरबीआय ग्रामीण भारताला बेसिक बँकिंग आणि आर्थिक सेवा देण्यासाठी बनवले होते. ग्रामीण भागात इंटरनेट बँकिंगसारख्या सुविधा पुरेशा प्रमाणात विकसित झालेल्या नाहीत. ग्राहकांना बॅलन्स चौकशी, अकाउंट स्टेटमेंट डाउनलोड किंवा चेक बुकची विनंती आणि मर्यादित व्यवहार सुविधा यासारख्या सेवा मिळतात. ग्रामीण भागात डिजिटल पेमेंटच्या जाहिराती आणि नियम सुलभतेसह इंटरनेट बँकिंगमध्ये लवकरच बदल केले जाणार आहेत.

आरबीआयने ग्रामीण भागात इंटरनेट बँकिंग वापर वाढवण्यासाठी मोठे बदल केले आहेत. इंटरनेट बँकिंग सेवा सुरुवातील नॉन ट्रांजेक्शन सेवासाठी अनिवार्य होते. बॅलेन्स तपासणे, अकाऊंट स्टेटमेंट, चेकबुकसाठी सेवा होती. नियमात बदल केल्यानंतर ग्रामीण भागात इंटरनेट बँकिंगचा वापर वाढणार आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकइंटरनेट