Join us

500 रुपयांच्या नोटा मागे घेऊन, पुन्हा जारी होणार 1000 रुपयांच्या नव्या नोटा? RBI गव्हर्नर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 19:10 IST

पत्रकार परिषदेला संबोधित करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, 1.8 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा RBI च्या घोषणेनंतर, परत आल्या आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकत्याच 2000 रुपयांच्या (2000 rupees notes) नोटा माघ्या घेण्याची घोषणा केली. तेव्हापासूनच 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांसंदर्भात लोकांमध्ये अफवा पसरत आहेत. मात्र, गुरुवारी सकाळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यासंदर्भात सत्य सांगितले आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले, केंद्रीय बँकेने 500 रुपयेच्या नोटा मागे घेण्यासंदर्भात आणि 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा जारी करण्यासंदर्भात, कसल्याही प्रकारचा प्लॅन नाही. एवढेच नाही, तर त्यांनी लोकांना अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. 

पत्रकार परिषदेला संबोधित करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, 1.8 लाख कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा RBI च्या घोषणेनंतर, परत आल्या आहेत.   31 मार्च 2023 पर्यंत जेवढ्या 2000 रुपयांच्या नोटा व्यवहारात होत्या या त्याच्या अर्ध्या आहेत. 2000 रुपयांच्या नोट एक्सचेन्ज आणि जमा करण्यासाठी लोकांकडे 30 सेप्टेंबरपर्यंतचा वेळ आहे.

या शिवाय, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल करण्यात आला नसल्याची माहिती दिली. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला असून ईएमआयमध्येही तुर्तास कोणतीही बदल होणार नाही. रिझर्व्ह बँकेनं रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे क्रेडिट ग्रोथ आणि बँकिंग सिस्टिमदेखील उत्तम स्थितीत असल्याचे यावेळी सांगितले. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दासबँकिंग क्षेत्र