"रिझर्व्ह बँक सध्या एका डिजिटल करन्सीवर काम करत आहे. ही करन्सी क्रिप्टोकरन्सी पेक्षा वेगळी असेल. तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही मागे राहू इच्छित नाही. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या फायद्यांचा वापर केला पाहिजे," असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. बॉम्बे चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या १८५ व्या फाऊंडेशन दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.भारत यशस्वीते मार्गावर पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचंही दास म्हणाले. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावरही भाष्य केलं. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी आपले कर कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी मिळून योग्य ती पावलं उचलणं आवश्यक आहे, असंही दास यांनी नमूद केलं.
Digital Currency आणण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक; गव्हर्नर म्हणाले, "क्रिप्टोकरन्सी पेक्षा वेगळी असेल ही करन्सी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 14:14 IST
Digital Currency : क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळी करन्सी तयार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न, तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक, शक्तिकात दास यांचं मत
Digital Currency आणण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक; गव्हर्नर म्हणाले, क्रिप्टोकरन्सी पेक्षा वेगळी असेल ही करन्सी
ठळक मुद्देक्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळी करन्सी तयार करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक, शक्तिकात दास यांचं मत