RBI Governor News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांची यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना छातीत त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबद्दल रिझर्व्ह बँकेच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शक्तिकांता दास यांना अचानक अॅसिडिटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
सध्या त्यांची प्रकृती चांगली असून, त्यांना पुढील २ ते ३ तास रुग्णालयातून सुट्टी दिली जाईल. शक्तिकांता दास यांच्या प्रकृतीबद्दल काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती आरबीआयच्या प्रवक्त्यांनी दिली.