नवी दिल्लीः भारतीय रिझर्व्ह बँके(RBI)नं मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाद्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जावर 2 टक्क्यांची व्याजदराच्या स्वरूपात सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. व्याज अनुदाना(Interest Subvention)बरोबरच छोट्या कालावधीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या अशा शेतकऱ्यांना 7 टक्के व्याजदरावर सबसिडी मिळणार आहे. 2018-19 आणि 2019-20मध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. मोदी सरकारनं फक्त पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डाची सुविधा दिली आहे. वेळेत कर्ज चुकवणाऱ्यांना 3 टक्के सूटतसेच वेळेवर कर्ज चुकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजावर 3 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. हे नियम लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना वर्षं 2018-19 आणि 2019-20 घेतलेल्या कर्जावर फक्त 4 टक्के व्याज द्यावं लागणार आहे.
RBIनं किसान क्रेडिट कार्डावर दिली मोठी सूट; शेतकऱ्यांना मिळालं गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 17:44 IST