Ratan Tata's Love for Dogs : भारतातील महान उद्योगपती, दूरदृष्टीचे उद्योजक आणि मोठे समाजसेवक म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे. त्यांना जाऊन वर्ष पूर्ण झालं. पण तरीही त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या वाटतात. लोक रोज त्यांचे विचार सोशल मीडियावर शेअर करताना पाहायला मिळतात. कारण, त्यांचे जीवन केवळ व्यवसायाच्या यशोगाथेपुरते मर्यादित नव्हते. त्यांच्यात एक अत्यंत एक प्राणीप्रेमीही दडला होता. विशेषतः त्यांच्या जर्मन शेफर्ड श्वान टीटो बद्दलचे त्यांचे प्रेम नेहमीच चर्चेत राहिले.
टीटो केवळ पाळीव नाही, कुटुंबाचा सदस्यरतन टाटा यांनी टीटोला सुमारे सहा वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. टीटो त्यांच्यासाठी नुसता पाळीव प्राणी नसून कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होता. या प्रेमाची प्रचिती त्यांच्या मृत्युपत्रामधील तरतुदीवरून येते.रतन टाटांनी टीटोच्या चांगल्या संगोपनासाठी मृत्यूपूर्वी १२ लाख रुपयांची निश्चित रक्कम आणि दर तीन महिन्यांनी ३०,००० रुपयांचे पेन्शन देण्याची तरतूद केली होती.टीटोच्या देखभालीची जबाबदारी त्यांनी त्यांचे दीर्घकाळचे विश्वासू राजग शॉ यांच्यावर सोपवली होती.
पुरस्कारापेक्षा टीटो महत्त्वाचा!टीटोवरील त्यांचे प्रेम किती निस्सीम होते, हे दाखवणारी एक घटना खूप बोलकी आहे. सन २०१८ मध्ये, त्यांना लंडनमध्ये प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून प्रतिष्ठेचा 'जीवनगौरव पुरस्कार' स्वीकारायचा होता. मात्र, त्यावेळी टीटो आजारी असल्याने, टाटांनी तो पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, "माझा कुत्रा आजारी आहे, मी त्याला सोडून जाऊ शकत नाही." या एका निर्णयाने त्यांच्यातील भूतदया दिसते.
'बॉम्बे हाऊस' बनले श्वानांचे घररतन टाटा यांचे प्राण्यांवरील प्रेम केवळ घरातल्या पाळीव प्राण्यांपुरते मर्यादित नव्हते. त्यांची नेहमी अशी धारणा होती की, रस्त्यावरच्या भटक्या श्वानांनाही प्रेम, काळजी आणि सुरक्षितता मिळायला हवी.त्यांनी टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसला भटक्या कुत्र्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थानात रूपांतरित केले.ते अनेकदा सोशल मीडियावर भटक्या कुत्र्यांना दत्तक घेण्याचे आवाहन करत असत आणि जखमी प्राण्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असत.
ताज हॉटेलमधील प्रेम आणि सन्मानरतन टाटांच्या पशु प्रेमाचे एक सुंदर उदाहरण ताज हॉटेलमध्येही पाहायला मिळते. एकेकाळी ब्रिटिश राजवटीत हॉटेलच्या बाहेर 'कुत्र्यांना आणि भारतीयांना प्रवेश नाही' असा फलक लागलेला होता. परंतु, आज त्याच हॉटेलच्या परिसरात पावसाळ्यात कर्मचारी एका भटक्या कुत्र्याला छत्रीने वाचवताना दिसले.
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
हे व्हायरल झालेले फोटो रतन टाटांच्या संवेदनशील आणि दयाळू स्वभावाची साक्ष देतात. केवळ उद्योगपती म्हणून नव्हे, तर एक सच्चा पशु प्रेमी असलेली व्यक्ती म्हणून त्यांनी भारतीय उद्योगात एक वेगळी उंची गाठली.
Web Summary : Ratan Tata's love for animals is well-known. His dog, Tito, was family. Tata allocated funds for Tito's care and even declined an award due to Tito's illness. He transformed Bombay House into a haven for stray dogs, showcasing his compassion.
Web Summary : रतन टाटा का जानवरों के प्रति प्रेम जगजाहिर है। उनका कुत्ता, टीटो, परिवार था। टाटा ने टीटो की देखभाल के लिए धन आवंटित किया और टीटो की बीमारी के कारण एक पुरस्कार लेने से भी इनकार कर दिया। उन्होंने बॉम्बे हाउस को आवारा कुत्तों के लिए एक आश्रय में बदल दिया, जो उनकी करुणा को दर्शाता है।