Join us  

टाटांच्या आवडत्या कंपनीची जबरदस्त कामगिरी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी 11500 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 3:26 PM

या कंपनीच्या शेअरने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Tata Motors: उद्योगपती रतन टाटा यांच्या हृदयाच्या जवळ असलेल्या टाटा मोटर्सने (Tata Motors) वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रातही गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला. ट्रेडिंग सत्राच्या काही मिनिटांत कंपनीच्या कमाईत 11,500 कोटी रुपयांची वाढ झाली. आपण संपूर्ण वर्षाबद्दल बोललो, तर कंपनीच्या शेअर्समध्ये 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

टाटा मोटर्सचे शेअर्स विक्रमी पातळीवरटाटा समूहातील वाहन कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्सने वर्षाच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी विक्रमी पातळी गाठली. कंपनीच्या शेअर्सने 6.41 टक्क्यांच्या वाढीसह 802.60 रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला. मात्र, व्यवहार संपेपर्यंत शेअर परत 779.10 वर आले. विशेष म्हणजे, या शेअर्सनी वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करुन दिली आहे. आगामी काळात यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 11,500 कोटी रुपयांची वाढटाटा मोटर्सच्या मार्केट कॅपबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 2,62,056.34 कोटी रुपयांवर पोहोचले. एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 2,50,561.47 कोटी रुपये होते. याचा अर्थ असा की एका छोट्या ट्रेडिंग सत्रात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 11494.87 कोटी रुपयांची वाढ झाली. सध्या कंपनीचे हे 2,60,428.14 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :रतन टाटाटाटाशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक