Join us

रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:37 IST

Prime Focus Share: मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात कंपनीच्या शेअर्सला १०% चं अपर सर्किट लागलं. सलग चौथ्या दिवशी यात वाढ झाली. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे.

Prime Focus Share: मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात प्राइम फोकस लिमिटेडच्या शेअर्सला १०% चं अपर सर्किट लागलं. बीएसईवर स्मॉलकॅप शेअर्स प्रति शेअर १९१.२५ वर पोहोचला. सलग चौथ्या दिवशी यात वाढ झाली, ज्याला मजबूत व्हॉल्यूमचा पाठिंबा होता. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. एनएसईच्या ब्लॉक डील डेटानुसार, अनुभवी गुंतवणूकदार मधुसूदन केला यांच्या कंपनी सिंग्युलॅरिटी लार्ज व्हॅल्यू फंड I, II आणि III नं ६२.५ लाख शेअर्स खरेदी केले. हे कंपनीतील २.०१% हिस्स्याइतके आहे. हा करार ५ सप्टेंबर रोजी प्रति शेअर ₹१४२.५५ दरानं करण्यात आला.

काय आहे सविस्तर माहिती

प्राइम फोकसमध्ये मोठ्या भारतीय गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली आहे, तर दुसरीकडे, परदेशी गुंतवणूकदारांनी कंपनीतील त्यांचा हिस्सा कमी केलाय. माहितीनुसार, मरीना IV (सिंगापूर) आणि मरीना IV नं एकूण ४८.०६ लाख शेअर्स (सुमारे १.५५% हिस्सा) विकले. त्याचप्रमाणे, ऑगस्टा इन्व्हेस्टमेंट्स I ने ₹१४२.५५ प्रति शेअर या दरानं ५४.४८ लाख शेअर्स (सुमारे १.७५% हिस्सा) विकले.

रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

कंपनीच्या शेअरची स्थिती

प्राइम फोकस लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या काही महिन्यांत प्रचंड वाढ झाली आहे. स्मॉलकॅप शेअरमध्ये फक्त एका महिन्यात २६%, तीन महिन्यांत ७०% आणि सहा महिन्यांत ९२% वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून (YTD) तो ३७% वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत या शेअरमध्ये ११०% वाढ झाली आहे आणि पाच वर्षांत ४००% परतावा दिला आहे ज्यामुळे हा स्टॉक मल्टीबॅगर बनला आहे.

रणबीर कपूरची एन्ट्री

या मोठ्या गुंतवणूकदारांच्या एन्ट्रीपूर्वीच, अशी बातमी आली होती की बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरनं प्राइम फोकस स्टुडिओमध्ये १५-२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक प्रेफरन्शिअल अलॉटमेंटद्वारे करण्यात आली होती. कंपनीनं ४६ कोटींहून अधिक शेअर्स जारी करण्यास आधीच मान्यता दिली होती, ज्यामध्ये रणबीर कपूरचाही प्रस्तावित वाटपांमध्ये समावेश होता. असं म्हटले जाते की तो सुमारे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रणबीर कपूरशेअर बाजारगुंतवणूक