Join us  

'अपर सर्किट पे अपर सर्किट', खासगीकरणाच्या वृत्तानंतर 'या' सरकारी बँकांच्या शेअर्सनं केलं गुंतवणूकदारांना मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 6:43 PM

PSU Banks Shares Price Hike : खासगीकरणाच्या वृत्तानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये ७५ टक्क्यांपर्यंतची वाढ

ठळक मुद्देखासगीकरणाच्या वृत्तानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये ७५ टक्क्यांपर्यंतची वाढसेंट्र्ल बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये गेल्या तीन दिवसांपासून तेजी दिसून येत आहे. गुरूवारच्या कामकाजाच्या वेळेती निफ्टीवर पीएसयू बँक इंडेक्स ६ टक्क्यांनी मजबूत झाला. गेल्या तीन दिवसांमध्ये सरकारी बँकांच्या शेअर्स किंमत सातत्यानं वाढत आहे. यापैकी काही बँकांच्या शेअर्सनं तर ५६ ते ७५ टक्क्यांपर्यंत झेप घेतली आहे. म्हणजेच गेल्या ३ दिवसांमध्ये गुंतवणुकादारांचे १ लाख रूपयांचे १ लाख ७५ हजार रूपये झाले आहेत. ३ दिवसांपूर्वी वृत्तसंस्था रॉयटर्सनं सरकारनं बँक ऑफ इंडियासह ४ सरकारी बँका खासगीकरणासाठी शॉर्टलिस्ट केल्याचं वृत्त दिलं होतं. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सलग तिसऱ्या दिवशी २० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. तीन दिवसांमध्ये सेंट्रल बँकेच्या शेअर्सचा दर १३.९० रुपयांवरून २४ रूपयांवर पोहोचला आहे. या शेअरनं या कालावधीदरम्यान ७५ टक्क्यांची झेप घेतली. तर दुसरीकडे इंडियन ओव्हरसिज बँकेच्या शेअर्सनंही ३ दिवसांमध्ये ११ रूपयांवरून १९ रूपयांवर झेप घेतली. बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये १८ फेब्रुवारी रोजी १० टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. तीन दिवसांमध्ये या शेअर्सची किंमत ५८.६ रूपयांवरून ९३.१० रूपयांवर गेली. या शेअर्सनं गुंतवणूकदारांना तीन दिवसांत ५८ टक्क्यांचा परतावा दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्येही गुरूवारी १० टक्क्यांची तेजी दिसून आली. मंगळवार आणि बुधवारी बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स २० टक्क्यांनी वधारले होते. तीन दिवसांमध्ये हे शेअर्स १६ रूपयांवरून २५ रूपयांवर पोहोचले आहेत. अन्य सरकारी बँकांचेही शेअर्स वधारलेखासगीकरणासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या ४ बँकांशिवाय अन्य सरकारी बँकांचे शेअर्सही वधारले आहेत. गुरूवारीदेखील ही तेजी कायम होती. १८ फेब्रुवारी रोजी बँक ऑफ बडोदाच्या शेअर्स१३ टक्के, युनियन बँकेच्या शेअर्स १२ तर युको बँकेच्या शेअर्स ७ आणि पीएनबीच्या शेअर्स ५ टक्क्यांनी वधारले.  

टॅग्स :शेअर बाजारबँक ऑफ इंडियाबँक ऑफ महाराष्ट्रपैसागुंतवणूक