Join us

एकही तिकीट न विकता रेल्वेने कमावले चक्क ५४ कोटी रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:40 IST

Indian Railway: भारतीय रेल्वेकडे जगातील सर्वांत मोठे रेल्वेमार्गाचे जाळे आहे. रेल्वेच्या दररोज १० हजारहून अधिक पॅसेंजर गाड्या धावतात. त्यातून दोन कोटींहून अधिक नागरिक प्रवास करतात.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडे जगातील सर्वांत मोठे रेल्वेमार्गाचे जाळे आहे. रेल्वेच्या दररोज १० हजारहून अधिक पॅसेंजर गाड्या धावतात. त्यातून दोन कोटींहून अधिक नागरिक प्रवास करतात. परंतु सेंट्रल रेल्वेने एकही तिकीट न विकता एप्रिल ते ऑक्टोबर या काळात तब्बल ५४ कोटींची कमाई केली आहे. रेल्वेच्या पाच मंडळांनी केवळ जाहिरातींमधून इतकी कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. 

सर्वाधिक कमाई कशातून? रेल्वेला सर्वाधिक कमाई तिकीटविक्रीतून नव्हे तर मालवाहतुकीतून होते. रेल्वेन एप्रिल ते ऑक्टोबरच्या दरम्यान ८८७.२५ मेट्रिक टन मालाच्या वाहतुकीतून ९५,९२९ कोटींची कमाई केली. मागील वर्षीच्या याच कालखंडाच्या तुलनेत यात ३,५८४ कोटींनी वाढ झाली आहे.

कोणत्या माध्यमातून जाहिराती?- डब्यांवरील व्हिनाइल रॅपिंग - स्टेशनवर लावलेली होर्डिंग्ज - विविध ठिकाणी टीव्ही स्क्रीन्स

टॅग्स :भारतीय रेल्वेपैसा