New GST Rates: आजपासून नवे जीएसटी दर लागू झाले आहेत. यासोबतच कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या नवीन किमतींची यादी जाहीर केली आहे. रेल नीरनंही त्यांच्या किमती कमी केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयानं यासंदर्भात इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसंच रेल नीरच्या एक लिटर बाटलीची किंमत १५ रुपयांवरून १४ रुपये करण्यात आली आहे. त्याच वेळी, ५०० मिलीची बाटली आता १० रुपयांऐवजी ९ रुपयांना उपलब्ध होईल, असं त्यांनी नमूद केलंय. प्रत्येक प्रवासाचा साथीदार, आता आणखी किफायतशीर, अशी पोस्ट रेल्वे मंत्रालयानं केली आहे.
२१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ सप्टेंबरपासून "जीएसटी बचत महोत्सव" सुरू होणार असल्याची घोषणा केली. नवीन जीएसटी दर लागू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं.
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्टमध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
दैनंदिन वापराच्या वस्तू झाल्या स्वस्त
जीएसटी कपातीचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. परिणामी, साबण, पावडर, कॉफी, डायपर, बिस्किटं, तूप आणि तेल यासारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू सोमवारपासून स्वस्त झाल्या आहेत. या कंपन्यांनी २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या साबण, शाम्पू, बेबी डायपर, टूथपेस्ट, रेझर आणि आफ्टर-शेव्ह लोशनसह त्यांच्या उत्पादनांच्या कमाल किरकोळ किमतींची सुधारित यादी जाहीर केली आहे.
अमूल आणि पतंजली सारख्या कंपन्यांनीही किमती कमी केल्या आहेत. आजपासून नवीन दर लागू झाल्यामुळे कार, बाईक आणि इतर वस्तूही स्वस्त झाल्यात. ऑटो कंपन्यांनीही नवीन वाहनांच्या किमती जाहीर केल्यात.
तंबाखू आणि सिगारेट महागल्या
या महिन्याच्या सुरुवातीला, जीएसटी कौन्सिलनं जीएसटीचे दर चार वरून दोन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पाच आणि १८ टक्के असे नवे दर असतील. तर लक्झरी उत्पादनांवर विशेष ४० टक्के दर असेल. सिगारेट, तंबाखू आणि इतर संबंधित वस्तू वगळता नवीन कराचे दर २२ सप्टेंबरपासून लागू झालेत.