Join us  

अशोका विद्यापीठाने आत्मा गमावला, भारतासाठी दुःखद घटना; राजन यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 2:44 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (raghuram rajan) यांनी लिंक्डइन पोस्टवर भाष्य केले आहे.

ठळक मुद्देरघुराम राजन यांची अशोका विद्यापीठ राजीनामा प्रकरणी टीकालिंक्डइन पोस्ट करत या प्रकरणावर केले भाष्यभारतासाठी ही एक दुःखद घटना आहे - राजन

नवी दिल्ली : ज्येष्ठ विद्वान व अभ्यासक प्रताप भानु मेहता यांनी आठवड्याच्या सुरुवातीला अशोका विद्यापीठाकडे आपला राजीनामा सादर केला. यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावरून अशोका विद्यापीठात राजीनामा सत्र सुरू झाले. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (raghuram rajan) यांनी लिंक्डइन पोस्टवर भाष्य केले आहे. अशोका विद्यापीठाच्या संस्थापकांनी आत्मा गमावला आहे, अशी टीका रघुराम राजन यांनी केली आहे. (raghuram rajan criticised on ashoka university resign case)

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एका महान विद्यापीठाचा आत्मा आहे आणि त्याच्याशी तडजोड करून अशोक विद्यापीठाच्या संस्थापकांनी आपला आत्मा गमावला आहे. भारतासाठी ही एक दुःखद घटना आहे, असे राजन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सुब्रमणियन आणि मेहता यांची राजीनामापत्रे असे सूचित करतात की, विद्यापीठाचे संस्थापक त्रासदायक टीकांपासून मुक्त होण्यासाठी बाहेरील दबावाला बळी पडले आहे, असा आरोपही राजन यांनी केला आहे. 

रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका

प्राध्यापक मेहता व्यवस्थापनाच्या बाजूने एक काटा 

अशोका विद्यापीठ हे या आठवड्यापर्यंत केंब्रिज, हार्वर्ड आणि ऑक्सफोर्ड सारख्या विद्यापीठांना येत्या दशकात भारताकडून संभाव्य प्रतिस्पर्धी मानला जाईल असे काम करत होते. वास्तविकता अशी आहे की, प्राध्यापक मेहता व्यवस्थापनाच्या बाजूचे एक काटा आहेत. ते कोणताही सामान्य काटा नाही. विरोधी पक्षांबद्दलही त्यांना सहानुभूती आहे असेही नाही, असा दावा राजन यांनी केला आहे.

भारताच्या कल्याणासाठी योगदान देण्यास सक्षम

अशोका विद्यापीठाच्या संस्थापकांना समजले पाहिजे होते की त्यांचे ध्येय खरंतर राजकीय बाजू घेण्याचे नाही तर मेहतांसारख्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांचे संरक्षण करणे आहे. कारण असे केल्याने ते अशोका विद्यापीठाला भारताच्या कल्याणासाठी सर्वांत मोठे योगदान देण्यास सक्षम करत होते ,काय चूक आहे हे ओळखण्यासाठी आणि त्या चूकांवर उपाय शोधाण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करत होते, असेही राजन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान  मोदी सरकारमधील माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांनीही मेहता यांच्या राजीनाम्यानंतर आपला राजीनामा दिला. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये यासंदर्भात जोरदार निषेध व्यक्त केला. शिक्षकांनी मेहता यांच्या परतीची मागणी करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले असून, आणखी दोन शिक्षक सोडण्याच्या मार्गावर असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :रघुराम राजन