Join us
Daily Top 2Weekly Top 5

दमानींच्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, D-Mart च्या बिझनेसबाबत मोठी अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 17:10 IST

दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्ट्स या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. डी-मार्ट (D-Mart) नावाची रिटेल चेन चालवणाऱ्या अव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर्स बुधवारी 5 टक्क्यांहून अधिक वाढून 3909.90 रुपयांवर पोहोचले. राधाकिशन दमानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी सप्टेंबर 2023 च्या तिमाहीचे बिझनेस अपडेट शेअर केल्यानंतर आली आहे. एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर्स बुधवारी वाढून 3,860 रुपयांवर बंद झाले.

12000 कोटींपेक्षा अधिक रेव्हेन्यूरिटेल चेन डी-मार्ट चालवणारी कंपनी एव्हेन्यू सुपरमार्ट्सनं दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा स्वतंत्र महसूल 18.51 टक्क्यांनी वाढून 12,307.72 कोटी रुपये झाला आहे. एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा एक वर्षापूर्वी याच कालावधीत महसूल 10384.66 कोटी रुपये होता. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 22 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा स्टँडअलोन महसूल 7650 कोटी रुपये होता.D-Mart च्या स्टोअर्सची संख्या वाढली30 सप्टेंबर 2023 रोजी रिटेल चेन डी-मार्टच्या स्टोअरची संख्या 336 होती. जून तिमाहीच्या अखेरीस DMart ची 327 स्टोअर्स होती. डीमार्ट त्याच्या रिटेल चेनमध्ये व्हॅल्यू रिटेलिंगवर लक्ष केंद्रित करते. कंपनी फूड्स, नॉन-फूड्स (FMCG), जनरल मर्चेंडाईज आणि परिधान उत्पादनं ऑफर करते. राधाकिशन दमानी यांच्या नेतृत्वाखालील प्रवर्तकांकडे जून 2023 च्या तिमाहीत कंपनीत 74.65 टक्के हिस्सा आहे.एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर्स गेल्या एक वर्षापासून दबावाखाली आहेत. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. एव्हेन्यू सुपरमार्ट शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 4601.90 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 3292.65 रुपये आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :व्यवसायशेअर बाजार