Join us

R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचं घर, एकूण किती कमाई करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 11:24 IST

R Madhavan: अभिनेता आर माधवनला ओळखत नसेल अशी क्वचितच कोणी व्यक्ती असेल. अत्यंत साधेपणा आणि साध्या स्वभावासाठी तो ओळखला जातो. आता सध्या त्याचं नाव चर्चेत आलंय.

R Madhavan: अभिनेता आर माधवनला ओळखत नसेल अशी क्वचितच कोणी व्यक्ती असेल. अत्यंत साधेपणा आणि साध्या स्वभावासाठी तो ओळखला जातो. आता सध्या त्याचं नाव चर्चेत आलंय. अभिनेता आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांनी मुंबईतील पॉश वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) आलिशान फ्लॅट भाड्यानं दिला आहे. यातून त्याला घरबसल्या दरमहा साडेसहा लाख रुपये मिळणारे. जूनमध्ये याची नोंदणीही करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये आर माधवननं हा फ्लॅट १७.५० कोटी रुपयांना विकत घेतलेल्या होता.

रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म स्क्वेअरयार्ड्सनं दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील सिग्निया पर्ल येथील आर माधवन याचा फ्लॅट ३८८.५५ चौरस मीटरमध्ये (सुमारे ४,१८२ चौरस फूट) पसरला आहे. यासाठी ३९ लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट देण्यात आलं असून ४७ हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आणि १००० रुपये नोंदणी शुल्कही भरण्यात आलंय. ते दोन वर्षांसाठी भाड्यानं देण्यात आलंय. पहिल्या वर्षी दरमहा ६.५० लाख रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे, तर दुसऱ्या वर्षी ते ५ टक्क्यांनी वाढून सुमारे ६.८३ लाख रुपये होणार आहे.

आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

किती होणार फायदा?

अशाप्रकारे, आर माधवन आणि त्यांच्या पत्नीला या २४ महिन्यांत भाड्याच्या माध्यमातून एकूण १.६० कोटी रुपये मिळतील. त्यांना पहिल्या वर्षी ४.५ टक्के आणि दुसऱ्या वर्षी ४.७ टक्के नफा मिळेल, परंतु १७.५ कोटी रुपयांना खरेदी केलेलं हे घर भाड्यानं देऊनही, तो नफ्यात राहणार नाही. कारण तो खरेदीच्या अर्धीही किंमत तुर्तास भाड्यातून भाड्यातून वसूल करू शकणार नाही.

कोणत्या चित्रपटांमध्ये दिसणार?

आर माधवनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो आता काजोलसोबत 'मा' या हॉरर चित्रपटात दिसणार आहे. त्यात तो एक छोटासा रोल करणार आहे. यापूर्वी तो अक्षय कुमार आणि अनन्या पांडेसोबत 'केसरी २' मध्ये दिसला होता आणि आता त्याचा फातिमा सना शेखसोबत 'आप जैसा कोई' हा चित्रपट आहे. हा चित्रपट जुलै २०२५ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो अजय देवगण, रकुल प्रीत सिंग आणि जिमी शेरगिलसोबत 'दे दे प्यार दे २' मध्येही दिसणार आहे.

टॅग्स :बॉलिवूडव्यवसाय