Join us  

चीनला झटका! चेन्नईत तयार होणार 5G आणि 6G Qualcomm चिपसेट, मोदी सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 7:03 PM

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये क्वालकॉमच्या डिझाईन सेंटरचे उद्घाटन केले.

चेन्नई: गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील Smartphones मार्केट सातत्याने वाढत आहे. जगभरातील अनेक कंपन्या चीनऐवजी भारताला प्राधान्य देत आहेत. या स्मार्टफोन मार्केटला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडूनही सातत्याने पावले उचलली जाताहेत. भारतात अधिकाधिक स्मार्टफोन्सचे उत्पादन व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अमेरिकन कंपनी Qualcomm सोबत एक करार केला आहे. 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी आज तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये क्वालकॉमच्या डिझाईन सेंटरचे उद्घाटन केले. तसेच, त्यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने अमेरिकन टेक कंपनी क्वालकॉम, भारतात 6G लॅब आणि 100 5G लॅब स्थापन करणार आहे. या अमेरिकन कंपनीने भारतात 177.27 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णयही घेतला आहे. आता देशात आता मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टर तयार केले जातील आणि यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. 

काय आहे सरकारची योजना ?स्मार्टफोन बाजाराला चालना देण्यासाठी भारत सरकारकडून सातत्याने नवनवीन पावले उचलली जात आहेत. आता सरकारने स्मार्टफोनच्या काही भागांवरील आयात करही कमी केला आहे. स्मार्टफोनचे जास्तीत जास्त उत्पादन भारतात व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. यामुळे भारतात स्मार्टफोनच्या किंमतीही कमी होणार आहेत. सरकारच्या या पावलामुळे चीनला मोठा धक्का बसणार आहे. कारण, सध्या सेमीकंडक्टर आणि स्मार्टफोन मार्केटवर चीनचे वर्चस्व आहे. भारतात हा व्यवसाय वाढल्यास अनेक देश चीनऐवजी भारताला प्राधान्य देतील.

टॅग्स :चेन्नईव्यवसायगुंतवणूकअश्विनी वैष्णवनरेंद्र मोदी