मुंबई : सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सवलत मिळावी किंवा किमानपक्षी त्यात करभार वाढू नये, अशी अपेक्षा ‘लोकमत’च्या सर्वेक्षणाद्वारे वाचकांनी व्यक्त केली आहे.
१ फेब्रुवारी रोजी सादर होत असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून जनतेच्या अपेक्षांचे चित्र निर्माण झाले आहे.
पेट्रोलच्या किमती याहून अधिक न वाढता स्थिर राहतील, असा विश्वास लोकांना वाटत आहे. मोदी सरकार आत्मनिर्भर भारताला अधिक बळ देतील, असा आशावादही व्यक्त होत आहे.
८२% - लोकांना वाटते की, आरोग्य क्षेत्राला अर्थसंकल्पात प्राधान्यक्रम दिला जाईल.
८१% - लोकांच्या मते महागाईत फारसा फरक पडणार नाही.
४५% - वाचकांच्या मते अर्थसंकल्पात मध्यम आणि लघू उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल.
प्राप्तिकर सवलतीची जनतेला अपेक्षा, आरोग्य, कृषी क्षेत्रालाही मिळू शकते नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 07:59 IST
Budget 2021 : सोमवारी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सवलत मिळावी किंवा किमानपक्षी त्यात करभार वाढू नये, अशी अपेक्षा ‘लोकमत’च्या सर्वेक्षणाद्वारे वाचकांनी व्यक्त केली आहे.
प्राप्तिकर सवलतीची जनतेला अपेक्षा, आरोग्य, कृषी क्षेत्रालाही मिळू शकते नवसंजीवनी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}