Join us

'या' सरकारी बँकेत पैशांची गुंतवणूक करा, पुढील 6 महिन्यात मिळेल 60 टक्क्यांहून अधिक रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:37 IST

bank of baroda : या बँकेतील शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीनंतर तुम्हाला 6 महिने ते एका वर्षाच्या कालावधीमध्ये 60 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो.

ठळक मुद्देसरकारी बँक असल्यामुळे याठिकाणी इतर कंपन्यांच्या तुलनेत जोखीमही कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक गुंतवणुकदारांना याठिकाणी गुंतवणूक करणे सुरक्षित वाटेल.

नवी दिल्ली : सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda BoB) च्या गुंतवणुकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. जर तुमची सरकारी बँकेमध्ये (PSU Banks) पैसे गुंतवणूक करून कमाई करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये (Investment in Shares) पैसे गुंतवू शकता. (psu bank bank of baroda can rally 60 percent in 6 to 12 months says clsa report) 

या बँकेतील शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीनंतर तुम्हाला 6 महिने ते एका वर्षाच्या कालावधीमध्ये 60 टक्क्यांचा रिटर्न मिळू शकतो. एका रिसर्च रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, सरकारी बँक असल्यामुळे याठिकाणी इतर कंपन्यांच्या तुलनेत जोखीमही कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक गुंतवणुकदारांना याठिकाणी गुंतवणूक करणे सुरक्षित वाटेल.

शेअरमध्ये 60 टक्क्यांची तेजी येईलविदेशी ब्रोकरेज फर्म CLSA च्या मते, बँक ऑफ बडोदाच्या शेअरमध्ये पुढील सहा महिने ते एका वर्षात 60 टक्के उसळी येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बँकेच्या कॉर्पोरेट क्रेडिट सायकलमध्ये बदल होत आहेत आणि पर्याप्त निधी गोळा करण्यासाठी बँकेकडे तेवढी रक्कम आहे. याशिवाय, कोरोना काळात बँकेची रिटेल अॅसेट क्लालिटी देखील मजबूत झाली आहे.

बँकेची कमाई वाढण्याचा अंदाजब्रोकरेज फर्म CLSA चे म्हणणे आहे की, बँक ऑफ बडोदामध्ये सद्यस्थितीत व्हॅल्यूएशन 0.55 टक्के आहे. या विदेशी ब्रोकरेज फर्मने बँकेच्या कमाईचा अंदाज 4-5 टक्के वाढेल असे म्हटले आहे. तसेच प्राइस टारगेट देखील 125 रुपयांवरुन 130 रुपये केली आहे. बँक ऑफ बडोदाचा शेअर (Investment in Share Market) मंगळवारी 81.20 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता.

 

टॅग्स :बँकपैसागुंतवणूकव्यवसाय