नवी दिल्ली- बऱ्याचदा सामान्य लोकांना वाटतं की, छोटी गुंतवणूक जास्त फायदेशीर नाही. जास्त पैसे गुंतवल्यास फायदाही जास्त मिळतो, अशीही अनेकांची धारणा आहे. जर आपल्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नसले तरी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. पोस्टात गुंतवलेल्या पैशांची हमी तर मिळतेच, शिवाय त्यावर व्याजाच्या स्वरूपात जास्त फायदा पोहोचतो. पोस्टातली आरडीसुद्धा अशाच प्रकारे छोट्या गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देते. या खात्यामधल्या पैशावर मिळालेल्या व्याजाच्या 10 हजारांपर्यंतच्या रकमेवर कोणताही कर द्यावा लागत नाही.पोस्टात बचत खातं उघडण्यासाठी आपल्याला फक्त 20 रुपये खर्च करावे लागतात. पोस्टातील बचत खातं हे रोख रकमेतूनच उघडता येते. ज्यावेळी आपण 500 रुपये देऊन खातं उघडता, तेव्हा आपल्याला पोस्ट ऑफिस धनादेशाची सुविधा उपलब्ध करून देते. तसेच कमीत कमी खात्यात 500 रुपये जमा करून ठेवावेच लागतात. तसेच आपल्याला धनादेश नको असल्यास कमीत कमी 50 रुपये जमा ठेवून खातं कार्यान्वित ठेवू शकतो. तर पोस्टात ठेवलेल्या रकमेवर 7.3 टक्के व्याज मिळतं. याच गुंतवणुकीवर आपल्याला नव्या व्याजदरानुसार फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी ठेवलेल्या ठेवींवर प्राप्तिकर कायदा 80 सीअंतर्गत सूटही दिली जाते. त्यामुळे या पैशांवर कोणताही कर लागत नाही.
पोस्टाची योजना आहे खास, दर महिन्याला 3 हजार गुंतवून 2 लाखांहून जास्त फायदा कमवा हमखास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 18:00 IST