Join us

PMJJBY & PMSBY : 'या' योजनांच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, 4 लाखांचे नुकसान टाळण्यासाठी करा 'हे' काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 13:13 IST

PMJJBY & PMSBY : केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या अशा दोन योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY).

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांसाठी सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. लहान प्रीमियम भरून तुम्ही यापैकी काही योजनांचा लाभ घेऊ शकता. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या अशा दोन योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY).

दरम्यान, तुम्ही प्रीमियम भरून या योजनांचा लाभ घेऊ शकता. दरवर्षी 31 मे पर्यंत त्यांचे नूतनीकरण केले जाते. त्यांच्या नूतनीकरणासाठी, तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे. ही नूतनीकरणाची रक्कम मागील वर्षांमध्ये नावनोंदणी केलेल्या लोकांच्या खात्यातून ऑटो डेबिट केली जाते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) मध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोक सामील होऊ शकतात. यासाठी 2 लाख रुपयांचा आयुर्विमा दरवर्षी 330 रुपये भरल्यास उपलब्ध आहे. याचबरोबर, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत (PMSBY) 18 वर्षे ते 70 वर्षे वयोगटातील लोक सहभागी होऊ शकतात. यामध्ये 12 रुपयांच्या पेमेंटवर 2 लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे.

दोन्ही योजनांसाठी 342 रुपयांचा प्रीमियम प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत, अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व कव्हर केले जाते. अपघाती मृत्यू झाल्यास विमाधारकास 2 लाख रुपये आणि अंशतः अपंगत्व आल्यास विमाधारकास 1 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. त्यानुसार 31 मे पर्यंत दोन्ही योजनांसाठी 342 रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरावा लागेल. जर, तुमच्या खात्यात पुरेशा बॅलन्ल नसल्यास तुम्हाला विमा संरक्षण मिळू शकणार नाही. या स्थितीत तुम्हाला 4 लाख रुपयांच्या विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागेल.

टॅग्स :बँकपैसाव्यवसाय