Join us

PM मोदींच्या वाढदिवशी सुरू होणार 13000 कोटींची विश्वकर्मा योजना, 30 लाख कामगारांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 15:44 IST

PM Vishwakarma Scheme: 2023-24 आर्थिक वर्षात 13,000 कोटी रुपयांच्या माध्यमातून 30 लाख कामगारांना लाभ मिळेल.

PM Vishwakarma Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. देशातील कामगार आणि कौशल्यवान लोकांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे. ही योजना विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर 2023 पासून लागू करण्यात येत आहे. योगायोगाने या दिवशी पीएम मोदींचा वाढदिवस आहे. 

केंद्रीय शिक्षण शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजनेसाठी 13,000 कोटी रुपये जारी केले आहेत, यातून 2023-24 या आर्थिक वर्षात 30 लाख कामगारांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. 17 सप्टेंबर रोजी सुरू होणारी ही योजना एमएसएमई, कौशल्य विकास आणि वित्त मंत्रालय, या तीन मंत्रालयांद्वारे लागू केली जाईल.

काय आहे PM विश्वकर्मा योजना, कोणाला होणार फायदा?या योजनेद्वारे सरकार पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना मदत करेल. यामध्ये सोनार, लोहार, न्हावी आणि चांभार यांसारख्या पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश आहे. योजनेंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.

काय म्हणाल ेहोते पीएम मोदी?

15 ऑगस्ट 2023 रोजी दिलेल्या भाषणात पीएम मोदींनी या योजनेचा उल्लेख करताना सांगितले होते की, मुद्रा योजनेतून तरुणांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून आठ कोटी लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला असून प्रत्येक व्यवसायाने लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या देशातील तरुणांनी भारताला जगातील पहिल्या 3 स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान मिळवून दिले आहे. आज जगभरातील तरुण भारताची ही क्षमता पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.

टॅग्स :नरेंद्र मोदीकेंद्र सरकार