Ayushman Card Abhiyan : भारत सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी सुरू केलेली आयुष्मान भारत योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्मान कार्ड आता तुम्ही घरी बसूनही बनवू शकता. या योजनेत ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळतात.
आयुष्मान कार्डचे फायदेसन २०१८ मध्ये सुरू झालेले हे हेल्थ कार्ड धारकांना देशभरातील हजारो सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळवून देते. यामध्ये हृदयविकार, कर्करोग, न्यूरोलॉजिकल आजार, किडनी आणि युरिनरी समस्या, यकृत रोग आणि श्वासोच्छवासाशी संबंधित गंभीर आजारांवर उपचार मिळतात. या योजनेत पोर्टेबिलिटीचा लाभ मिळतो, म्हणजे लाभार्थी आपल्या गृहराज्यात किंवा इतर कोणत्याही राज्यात उपचार घेऊ शकतो.
आवश्यक कागदपत्रे
- फॅमिली आयडी/रेशन कार्ड
- आधार कार्ड
- फोटो
- आधार लिंक असलेला मोबाईल नंबर
- लाभार्थी यादी तपासण्यासाठी आशा वर्करशी संपर्क.
- ऑनलाइन आयुष्मान कार्ड कसे बनवावे (स्टेप-बाय-स्टेप)
आयुष्मान कार्ड बनवण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल झाली आहे.
- सर्वात आधी आपल्या फोनवर 'Ayushman' हे सरकारी ॲप इन्स्टॉल करा.
- ॲप उघडून, तुमच्या पसंतीची भाषा निवडा आणि 'लॉगिन' वर क्लिक करून Beneficiary (लाभार्थी) निवडा.
- मोबाईल नंबर आणि कॅप्चा भरल्यानंतर 'सर्च फॉर बेनिफिशियरी' पेज उघडेल.
- येथे स्कीममध्ये PM-JAY निवडा, त्यानंतर आपले राज्य आणि जिल्हा निवडा. आधार क्रमांक टाकून तुम्ही ॲपमध्ये लॉगिन करू शकता.
- ॲपमध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांची यादी दिसेल. ज्या सदस्याचे कार्ड बनलेले नसेल, त्यांच्या नावापुढे 'Authenticate' असे लिहिलेले दिसेल.
- 'Authenticate' वर टॅप करून आधार नंबर टाका आणि आलेला OTP भरून सदस्यचा फोटो क्लिक करा.
- सदस्याचा मोबाईल नंबर आणि तुमचे त्यांच्याशी असलेले नाते भरून e-KYC पूर्ण करा आणि फॉर्म सबमिट करा.
वाचा - डिफेन्स स्टॉक्सचा मल्टीबॅगर परतावा! ५ वर्षात १ लाखाचे झाले १६ लाख; आता सरकारकडून मिळाली नवीन ऑर्डर
सर्व माहितीची पडताळणी एका आठवड्यात झाल्यावर तुम्ही याच ॲपमधून त्या सदस्याचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.
Web Summary : Ayushman Bharat Yojana provides free healthcare up to ₹5 lakhs. Eligible individuals can now create their Ayushman card online using the Ayushman app. Key documents include family ID, Aadhaar card, and linked mobile number. The process is now fully digital, simplifying access to healthcare benefits.
Web Summary : आयुष्मान भारत योजना 5 लाख रुपये तक मुफ्त स्वास्थ्य सेवा प्रदान करती है। पात्र व्यक्ति अब आयुष्मान ऐप का उपयोग करके ऑनलाइन आयुष्मान कार्ड बना सकते हैं। आवश्यक दस्तावेजों में परिवार आईडी, आधार कार्ड और लिंक किया हुआ मोबाइल नंबर शामिल हैं। प्रक्रिया अब पूरी तरह से डिजिटल है, जिससे स्वास्थ्य सेवा लाभों तक पहुंच आसान हो गई है।