Join us

१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 15:29 IST

Pizza Hut For Sale : पिझ्झा हटची स्थापना १९५८ मध्ये कॅन्ससमधील विचिटा येथे दोन भावांनी केली होती. सध्या १०० हून अधिक देशांमध्ये पिझ्झा हटची अंदाजे २०,००० स्टोअर्स आहेत.

Pizza Hut For Sale : जगप्रसिद्ध पिझ्झा चेन पिझ्झा हटची मूळ कंपनी यम ब्रँड्सने मंगळवारी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने पिझ्झा हट ब्रँडची विक्री करण्याच्या किंवा अन्य संभाव्य पर्यायांचा विचार करण्यासाठी औपचारिक चाचपणी सुरू केली आहे. बाजारपेठेतील वाढती स्पर्धा आणि ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडीमुळे पिझ्झा हटला व्यवसायात येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ, पण अमेरिकेत घसरणयम ब्रँड्सचे सीईओ क्रिस टर्नर यांनी सांगितले की, पिझ्झा हटची जागतिक नेटवर्क, मजबूत ब्रँड ओळख आणि अनेक आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये स्थिर वाढ अशी अनेक बलस्थाने आहेत. पिझ्झा हटचे सध्या १०० हून अधिक देशांमध्ये सुमारे २०,००० स्टोअर्स आहेत. या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत याची आंतरराष्ट्रीय विक्री २% नी वाढली आहे. पण, कंपनीच्या उत्पन्नापैकी सुमारे अर्धी कमाई अमेरिकेतील बाजारातून येते, जिथे तिचे ६,५०० आउटलेट्स आहेत. मात्र, याच कालावधीत अमेरिकेत विक्रीत ७% नी घट झाली आहे. पिझ्झा हट अनेक वर्षांपासून आपल्या पारंपरिक 'डाइन-इन रेस्टॉरंट' मॉडेलमुळे अडचणीत आहे, कारण ग्राहक आता जलद डिलिव्हरी आणि ऑनलाइन ऑर्डरिंग सेवांकडे वळत आहेत.

घटती बाजारपेठेतील हिस्सेदारी२०२० मध्ये पिझ्झा हटच्या एका मोठ्या फ्रँचायझी भागीदाराने दिवाळखोरी घोषित केल्यानंतर सुमारे ३०० स्टोअर्स बंद करावी लागली होती. फूड कन्सल्टिंग फर्म टेक्नोमिकनुसार, अमेरिकेच्या पिझ्झा मार्केटमध्ये पिझ्झा हटचा वाटा २०१९ मध्ये १९.४% होता, जो आता १५.५% पर्यंत खाली आला आहे. क्रिस टर्नर म्हणाले की, पिझ्झा हटची टीम आव्हाने दूर करण्यासाठी मेहनत घेत आहे, पण सध्याचे प्रदर्शन पाहता ब्रँडची पूर्ण क्षमता वापरण्यासाठी अतिरिक्त पाऊले उचलणे आवश्यक आहे. 'हे लक्ष्य कदाचित यम ब्रँड्सच्या बाहेर उत्तम प्रकारे साधले जाऊ शकते,' असे मत त्यांनी व्यक्त केले.

यम ब्रँड्सच्या शेअर्समध्ये मोठी उसळीया घोषणेनंतर मंगळवारी दुपारपर्यंत यम ब्रँड्सचे शेअर्स सुमारे ७% नी वाढले. कंपनीकडे केएफसी, टाको बेल आणि हॅबिट बर्गर आणि ग्रील यांसारखे लोकप्रिय ब्रँड्स देखील आहेत. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल ८% नी वाढला, ज्यात केएफसी आणि टाको बेलच्या विक्रीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वाचा - UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे

पिझ्झा हटचा इतिहासपिझ्झा हटची सुरुवात १९५८ मध्ये अमेरिकेतील विचिटा शहरात दोन भावांनी ६०० डॉलरचे कर्ज घेऊन केली होती. १९७१ पर्यंत पिझ्झा हट जगातील सर्वात मोठी पिझ्झा चेन बनली. पेप्सिकोने १९७७ मध्ये याला विकत घेतले आणि १९९७ मध्ये रेस्टॉरंट विभाग वेगळा करून 'यम ब्रँड्स'ची स्थापना केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pizza Hut for sale despite global growth: Here's why.

Web Summary : Yum Brands is exploring selling Pizza Hut despite international growth. US sales decline and changing consumer preferences are major factors. The company aims to revitalize the brand.
टॅग्स :व्यवसायअमेरिकाऑनलाइन