Join us

आता एटीएममधून PF चे पैसे काढता येणार! काय आहेत नियम आणि अटी? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:34 IST

EPFO ATM Service: पीएफ खातेधारकांना वर्ष २०२५ च्या सुरुवातीला एक विशेष भेट मिळू शकते. आता पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. एटीएममधून तुम्ही पीएफ काढू शकता.

EPFO ATM Service: तुम्हीतर EPFO सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. EPFO अंतर्गत येणाऱ्या नोकरदारांना त्यांच्या EPF खात्यातून पैसे काढणे खूप सोपे होणार आहे. ईपीएफओ अशा प्रणालीवर काम करत आहे ज्याद्वारे कर्मचारी त्यांच्या ईपीएफ खात्यात जमा केलेले पैसे थेट एटीएममधून काढू शकतील. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, भारत सरकारचे श्रम आणि रोजगार मंत्रालय EPF खात्यात जमा केलेले पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपली IT प्रणाली अपग्रेड करत आहे.

बँकिंग व्यवस्थेसारखी ईपीएफओची आयटी इन्फ्रास्ट्रक्चर होणारसुमिता डावरा म्हणाल्या की IT २.१ अपग्रेड पुढील वर्षी जानेवारीमध्ये लागू होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर EPFO ​​ची IT इन्फ्रास्ट्रक्चर देशाच्या बँकिंग प्रणालीसारखी होईल. यामुळे EPFO ​​सदस्य आणि पेन्शनधारकांना त्यांच्या EPF खात्यात रक्कम काढणे सुलभ होईल. यासाठी डेबिट कार्डसारखे एक कार्ड पीएफ काढण्यासाठी देण्यात येणार आहे. याचा वापर करुन एटीएममशीनमधून पैसे काढता येणार आहे.

पीएफ विड्रॉल कार्डकामगार सचिव सुमिता डावरा पुढे म्हणाल्या, की पीएफचे पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डसारखे पीएफ विड्रॉल कार्ड जारी करण्यात येईल. या कार्डच्या मदतीने, ईपीएफओ सदस्य एटीएममध्ये जाऊन त्यांच्या पीएफ खात्यात जमा केलेले पैसे काढू शकतील. पण, पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी मर्यादा असेल. EPFO सदस्यांना त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी जास्तीत जास्त ५० टक्के रक्कम एका वेळी काढता येईल. पीएफ सेटलमेंटची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सोपी करण्यात आली आहे. अनावश्यक प्रक्रिया सर्व बंद करण्यात आल्या आहेत.

पीएफ खात्यातून पैसे काढणे डाव्या हातचा मळपैसे काढण्याचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील. जर एखादी व्यक्ती एका महिन्यासाठी बेरोजगार असेल, तर तो त्याच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम काढू शकतो. तर दोन महिन्यांनंतर, तो त्याच्या खात्यात जमा केलेली सर्व रक्कम काढू शकतो. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या या पावलामुळे नोकरदार लोकांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढणे खूप सोपे आणि जलद होणार आहे.

ईपीएफओमधील या नवीन आणि सुधारित प्रणालीमध्ये बँक एटीएम कार्डसारखे विशेष पीएफ विड्रॉल कार्ड समाविष्ट असेल. आयटी सुधारणांचा एक भाग म्हणून, पीएफ काढण्याशी संबंधित अनावश्यक प्रक्रिया दूर करून दाव्याची प्रक्रिया जलद केली जात आहे. सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० अंतर्गत GIG आणि प्लॅटफॉर्म कामगारांना लाभ देण्यासह सामाजिक सुरक्षा सुधारण्याच्या आपल्या वचनसोबत कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :केंद्र सरकारकामगारपैसा