Join us

पेट्रोल होणार स्वस्त? २० टक्के इथेनॉलमिश्रित इंधनाची लवकरच विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 09:45 IST

वाढत्या इंधनाच्या किमतीवर फ्लेक्स फ्युएल तसेच इथेनाॅलमिश्रित पेट्राेलच्या पर्यायावर विचार करण्यात येत आहे.

जयपूर : वाढत्या इंधनाच्या किमतीवर फ्लेक्स फ्युएल तसेच इथेनाॅलमिश्रित पेट्राेलच्या पर्यायावर विचार करण्यात येत आहे. देशात २० टक्के इथेनाॅलमिश्रित पेट्राेल डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापासूनच उपलब्ध हाेऊ शकेल, अशी माहिती पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिली. २० टक्के इथेनाॅल ब्लेंडिंग झाल्यास साधारणत: ८ ते ९ रुपये प्रति लीटर रुपयांनी पेट्राेलची किंमत कमी हाेऊ शकते.

देशभरात वर्ष २०२५ पर्यंत पूर्णपणे २० टक्के इथेनाॅलमिश्रित पेट्राेलची विक्री करण्यासाठी लक्ष्य ठेवले आहे. त्यापूर्वीच देशात काही प्रमाणात इथेनाॅल मिश्रित पेट्राेल उपलब्ध हाेण्याची शक्यता आहे. एप्रिल २०२३पर्यंत काही प्रमाणात यासाठी लक्ष्य ठेवले होते. त्यापूर्वीच पेट्रोल उपलब्ध होणार आहे. आम्ही इथेनाॅल निर्मितीचा सातत्याने आढावा घेत आहाेत, असे हरदीपसिंह पुरी म्हणाले. ब्राझीलसारख्या देशात फ्लेक्स फ्युएल वाहने उपलब्ध असून ग्राहकांना इथेनाॅल किंवा पेट्राेल, असे दाेन्ही पर्याय उपलब्ध आहे. भारतातही हेच उद्दिष्ट असून त्यासाठी वाहन उत्पादकांसाेबत लवकरच बैठक घेणार असल्याचे पुरी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

२०% इथेनाॅलमिश्रित पेट्राेल पुरविण्यासाठी १ हजार काेटी लीटर इथेनाॅलची गरज ४५० काेटी लीटर इथेनाॅलची सध्या निर्मिती४०० काेटी लीटर उत्पादनासाठी आणखी निविदा काढल्या१०% इथेनाॅलमिश्रित पेट्राेल सध्या देशात विकले जाते.४ अब्ज डाॅलर्सहून अधिक बचत परकीय गंगाजळीची हाेणार,प्रदूषणही हाेणार कमी

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :पेट्रोलडिझेल