Join us
Daily Top 2Weekly Top 5

Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:31 IST

Petrol Diesel Price: पाकिस्तानात पेट्रोल ४५८ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे, तर डिझेलचे दर ५०० रुपयांच्या पार गेलेत. पाहूया भारतात काय आहेत आजचे नवे दर.

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज पुन्हा कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ९४.७७ रुपये प्रति लिटर दरानं विकले जात आहे. तर, दिल्लीत आज शनिवारी डिझेलचा दर ८७.६७ रुपये प्रति लिटर आहे. सध्या जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेल्या वाढीमुळे जागतिक स्तरावर कच्चं तेल महागलंय. मात्र, देशांतर्गत पातळीवर भारत सरकारनं सामान्य जनतेला आतापर्यंत या दरवाढीचा चटका लागू दिलेला नाही.

पाकिस्तानात पेट्रोल ४५८ रुपये प्रति लिटर

पाकिस्तान सरकारने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली. पेट्रोल आणि हाय-स्पीड डिझेलच्या (HSD) किमतीत अनुक्रमे ४३ टक्के आणि ५५ टक्के अशी मोठी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानुसार, पेट्रोलची किंमत ३२१.१७ रुपयांवरून १३७.२३ रुपयांनी वाढवून ४५८.४१ रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. तसंच हाय-स्पीड डिझेलची किंमत ३३५.८६ रुपयांवरून १८४.४९ रुपयांनी वाढवून ५२०.३५ रुपये प्रति लिटरवर पोहोचली. हे नवीन दर तातडीनं लागू करण्यात आलेत. यासोबतच केरोसिन तेलाची किंमत ३४.०८ रुपयांनी वाढवून ४५७.८० रुपये करण्यात आली.

खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'

देशातील विविध शहरांतील पेट्रोलचे दर (Petrol Rate)दिल्ली: ९४.७७ रुपयेमुंबई: १०४.२१ रुपयेपुणे: १०४.०४ रुपयेकोलकाता: १०३.९४ रुपयेचेन्नई: १००.७५ रुपयेअहमदाबाद: ९४.४९ रुपयेबंगळुरू: १०२.९२ रुपये

विविध शहरांतील डिझेलचे दर (Diesel Rate)मुंबई: ९२.१५ रुपयेपुणे: ९०.५७ रुपयेकोलकाता: ९०.७६ रुपयेचेन्नई: ९२.३४ रुपयेअहमदाबाद: ९०.१७ रुपयेबंगळुरू: ८९.०२ रुपये

प्रीमियम इंधनाच्या किमतीत वाढ

काही दिवसांपूर्वी इंडियन ऑईलनं प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली होती. यामुळे दिल्लीत XP100 पेट्रोलचा दर १४९ रुपयांवरून १६० रुपये प्रति लिटर, तर एक्स्ट्रा ग्रीन डिझेलचा दर ९१.४९ रुपयांवरून ९२.९९ रुपये प्रति लिटरच्या स्तरावर पोहोचला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan fuel prices skyrocket; India's rates steady, comparatively lower.

Web Summary : Pakistani fuel prices surge to ₹458/liter for petrol, ₹520/liter for diesel. Indian prices remain stable: Delhi petrol at ₹94.77, diesel at ₹87.67. Premium fuel prices, however, have seen a slight increase. Other city rates also provided.
टॅग्स :पेट्रोलडिझेलअमेरिका-इस्रायल-इराण वॉरपाकिस्तानभारत