Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात पेट्राेलचे दर उच्चांकी पातळीच्या बराेबरीवर, नांदेडमध्ये सर्वाधिक दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 05:47 IST

petrol News : पेट्राेल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. मुंबईत डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर

मुंबई : पेट्राेल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. मुंबईत डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर असून, पेट्राेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या बराेबरीवर आहेत. नजीकच्या काळात त्यात आखीण वाढ हाेण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्या पेट्राेलचे दर ९०.३४ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचेदर ८०.४७ रुपये आहेत. डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर आहेत. पेट्राेलचे दर ४ ऑक्टाेबर, २०१८च्या उच्चांकी पातळीवर आले आहेत. राज्यात शु्क्रवारी नांदेडमध्ये सर्वाधिक ९२.६९ रुपये प्रति लिटर एवढे पेट्राेलचे दर झाले आहेत, तर अनेक शहरांमध्ये पेट्राेलचे दर ९० रुपयांपेक्षा जास्त असल्याने वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढलीकच्च्या तेलाचे दर गेल्या महिनाभरात सुमारे १० ते १२ डाॅलर्स प्रति बॅरलने वाढले आहेत, परंतु ओपेककडून उत्पादनात करण्यात आलेली घट, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्यामुळे कच्चे तेल महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :पेट्रोलमहाराष्ट्र