Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी सततची चढ-उतार थेट सामान्यांच्या खिशावर परिणाम करत असते. मध्य आशियातील भू-राजकीय तणावामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतींवर दबाव असला, तरी भारतीय तेल कंपन्यांनी किमतीत मोठे बदल न करता स्थिरता राखण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्याची आर्थिक राजधानी आणि पुण्यात काय स्थिती?
महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई आणि पुण्यात पेट्रोलचे दर अद्यापही १०४ रुपयांच्या वर आहेत. मुंबईत आज पेट्रोलचा भाव १०४.२१ रुपये प्रति लिटर आहे, तर पुण्यात हा दर १०४.०४ रुपये इतका आहे. डिझेलच्या बाबतीतही मुंबई आणि पुण्यात दर ९० रुपयांच्या वर असून, इतर शहरांच्या तुलनेत इंधन येथे महाग असल्याचे दिसून येते.
प्रमुख शहरांतील पेट्रोलचे आजचे दर (प्रति लिटर):
| शहर | पेट्रोल दर | शहर | पेट्रोल दर |
| मुंबई | १०४.२१ | पुणे | १०४.०४ |
| नवी दिल्ली | ९४.७२ | छत्रपती संभाजीनगर | १०६.१० (अंदाजित) |
| अहमदाबाद | ९४.४९ | हैदराबाद | १०७.४६ |
| नाशिक | ९५.५० | बेंगळुरू | १०२.९२ |
डिझेलचे दर: कुठे स्वस्त, कुठे महाग?उत्तर भारतात डिझेलचे दर दक्षिण आणि पूर्व भारताच्या तुलनेत काहीसे कमी आहेत. नवी दिल्लीत डिझेल ८७.६२ रुपये तर चंदीगडमध्ये सर्वात स्वस्त म्हणजे ८२.४५ रुपये दराने मिळत आहे. याउलट पाटणा आणि हैदराबादमध्ये डिझेलसाठी वाहनधारकांना अधिक खिसा रिकामा करावा लागत आहे.
डिझेलचे दर (प्रति लिटर):
- मुंबई: ९२.१५ रुपये
- पुणे: ९०.५७ रुपये
- पाटणा: ९३.८० रुपये
- नाशिक: ८९.५० रुपये
- सुरत: ८९.०० रुपये
देशात इंधनाचा तुटवडा आहे का?
पश्चिम आशियातील संघर्ष आणि सागरी मार्गावरील अडथळ्यांमुळे इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, "भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आपल्याकडे कच्च्या तेलाचा आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही." इतकेच नव्हे तर, एलपीजी पुरवठ्यात विलंब झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून केरोसीनचे उत्पादनही वाढवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा - अरब देशांमध्ये युद्धाची भीती, लाखो रुपयांच्या नोकऱ्या सोडून भारतीय परतीच्या मार्गावर
तुम्ही एका मेसेजद्वारे तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घेऊ शकता:
Indian Oil : 'RSP <शहर कोड>' टाइप करून 9224992249 वर पाठवा.BPCL : 'RSP' लिहून 9223112222 वर पाठवा.HPCL : 'HP Price' लिहून 9222201122 वर पाठवा.
Web Summary : Fuel prices fluctuate globally, impacting consumers. Despite geopolitical tensions, Indian oil companies maintain stable rates. Mumbai and Pune see higher petrol prices. Crude oil and fuel stocks are sufficient, with increased kerosene production for LPG delays.
Web Summary : ईंधन की कीमतें वैश्विक स्तर पर बदलती रहती हैं, जिससे उपभोक्ताओं पर असर पड़ता है। भू-राजनीतिक तनाव के बावजूद, भारतीय तेल कंपनियों ने स्थिर दरें बनाए रखी हैं। मुंबई और पुणे में पेट्रोल की कीमतें अधिक हैं। कच्चे तेल और ईंधन का स्टॉक पर्याप्त है, एलपीजी में देरी के लिए केरोसिन का उत्पादन बढ़ाया गया है।