Perfume Day 2026 : बहुतेक वेळा महागड्या परफ्युमची किंमत ५ हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान असते आणि काही लक्झरी परफ्यूम लाखांपर्यंत जातात, हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र, जगात काही परफ्युम असे आहेत ज्यांच्या एका लहान बाटलीसाठी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. या यादीत पहिल्या क्रमांकावर 'शुमुख' (Shumukh) येतो. दुबईतील नबील परफ्यूम्सनं लाँच केलेल्या या परफ्युमची किंमत सुमारे १२.९ लाख डॉलर म्हणजेच साधारण ११.७ कोटी रुपये आहे. ३ लिटरच्या या बाटलीला ३,५०० पेक्षा जास्त हिरे, मोती, सोनं आणि चांदीनं सजवण्यात आले आहे. यामध्ये अगरवूड, चंदनाचं लाकूड, कस्तुरी, तुर्की गुलाब आणि अंबरचा सुगंध आहे. तज्ज्ञांच्या मते, याच्या अवाढव्य किमतीचा मोठा हिस्सा दागिन्यांनी मढवलेल्या बाटलीमुळे आहे.
कोट्यवधींच्या किमतीतील इतर आघाडीचे ब्रँड्स
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 'DKNY गोल्डन डिलिशिअस मिलियन डॉलर फ्रेगरन्स बॉटल' आहे. २०११ मध्ये लाँच केलेल्या या सफरचंदाच्या आकाराच्या बाटलीची किंमत १० लाख डॉलर (सुमारे ९ कोटी रुपये) होती, ज्याला ३,००० मौल्यवान रत्नांनी सजवण्यात आलंय. तिसऱ्या क्रमांकावर 'क्लाइव्ह ख्रिश्चन नंबर १ इम्पीरियल मॅजेस्टी'चा समावेश होतो, ज्याच्या फक्त १० बाटल्या बनवण्यात आल्या होत्या. १८ कॅरेट सोनं आणि ५ कॅरेटच्या हिऱ्यानं सजवलेल्या या एका बाटलीची किंमत साधारण १.९ कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त, ९० च्या दशकातील 'बकारा लेस लार्म्स सैक्रे डि थेब्स' हा पिरामिड आकाराचा परफ्यूम त्याच्या क्रिस्टल डिझाइनमुळे सुमारे ५६ लाख रुपयांना मिळतो.
सोन्याच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी स्तराहून ₹२५,००० पर्यंत झालं स्वस्त, पाहा नवे दर
परफ्युम इतकी महाग असण्यामागची प्रमुख कारणं
परफ्युमची किंमत कोट्यवधींमध्ये असण्यामागे सुगंधापेक्षा त्या बाटलीवरील हिरे, सोनं, प्लॅटिनम आणि विशेष क्रिस्टल वर्क कारणीभूत असते. तसेच सुगंधासाठी वापरलं जाणारे नैसर्गिक अंबरग्रीस, ऊद आणि उच्च दर्जाचे गुलाबाचं तेल यांसारखे कच्चा माल परफ्युम उद्योगात अत्यंत महाग मानलं जातात. अशा परफ्युमचं उत्पादन मर्यादित संख्येत केलं जात असल्यानं त्यांचं वैशिष्ट्य आणि रिसेल व्हॅल्यू कमालीची वाढते.
भारतीय परफ्यूम बाजारपेठ
भारतातील परफ्यूमची बाजारपेठ आतापर्यंत सुमारे १२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून हा उद्योग १५ टक्क्यांहून अधिक वेगानं प्रगती करत आहे. असा अंदाज आहे की, २०३० पर्यंत ही बाजारपेठ ३६ हजार कोटी रुपयांवर (४ अब्ज डॉलर) जाईल. जगातील सर्वात प्रीमियम ब्रँड्सपैकी एक असलेल्या 'क्लाइव्ह ख्रिश्चन नंबर १ इंपीरियल मॅजेस्टी'ने देखील आता भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे.
Web Summary : Some perfumes cost crores due to rare ingredients and jeweled bottles. Top brands include Shumukh (₹11.7Cr), DKNY Golden Delicious (₹9Cr), and Clive Christian No. 1 Imperial Majesty (₹1.9Cr). The Indian perfume market is growing rapidly, projected to reach ₹36,000 crore by 2030.
Web Summary : कुछ परफ्यूम दुर्लभ सामग्री और जड़े हुए बोतलों के कारण करोड़ों के होते हैं। शीर्ष ब्रांडों में शुमुख (₹11.7 करोड़), डीकेएनवाई गोल्डन डिलीशियस (₹9 करोड़), और क्लाइव क्रिश्चियन नंबर 1 इम्पीरियल मैजेस्टी (₹1.9 करोड़) शामिल हैं। भारतीय परफ्यूम बाजार तेजी से बढ़ रहा है, जिसके 2030 तक ₹36,000 करोड़ तक पहुंचने का अनुमान है।