Join us  

Paytm  देणार GPay आणि PhonePe ला टक्कर, Fastag बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 10:27 AM

पेटीएम (Paytm) वेळोवेळी अनेक बदल करत असतं. आता फास्टॅगबाबतही मोठे निर्णय घेतले जात आहेत.

पेटीएम (Paytm) वेळोवेळी अनेक बदल करत असतं. आता फास्टॅगबाबतही मोठे निर्णय घेतले जात आहेत. पेटीएम ॲपच्या मदतीने फास्टॅग रिचार्ज करणं सोपं होणार आहे. त्यांच्या मदतीनं, फास्टॅग कधीही आणि कुठेही रिचार्ज केला जाऊ शकतो. त्याच्या मदतीनं तुम्ही टोल प्लाझावर लांबच लांब रांगाही टाळू शकता. 

तुम्ही पेटीएम ॲपवर फास्टॅग सहज खरेदी करू शकता. वास्तविक, पेटीएम पेमेंट बँक बंद झाल्यानंतर त्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. तुम्ही पेटीएमच्या ॲपवरून फास्टॅग ऑर्डर केल्यास तो एचडीएफसी बँकेकडून जारी केला जाईल. म्हणजेच पेटीएमनं ही सेवा बंद केलेली नाही. अशा परिस्थितीत तुमच्यासाठीही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. 

सर्वच चारचाकी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य आहे. तुम्ही तो वाहनाच्या विंड स्क्रीनवर बसवू शकता. हे प्रत्येकासाठी खूपच फायदेशीरही ठरू शकते. वाहनानं टोल ओलांडताच फास्टॅगमधून पैसे आपोआप कापले जातात. त्याच्या मदतीनं, टोल प्लाझावर पेमेंट करणं देखील खूप सोपं होतं. 

रिचार्ज कसं कराल? 

फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीही करावे लागणार नाही. तुम्हाला पेटीएम ॲपवर जावं लागेल. यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. या ठिकाणी जाऊन तुम्हाला फास्टॅग रिचार्जच्या पर्यायावर जावं लागेल. यामध्ये तुम्हाला वाहन आणि बँकेचे तपशील भरावे लागतील. परंतु या सर्व गोष्टी भरण्यापूर्वी, तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे नीट लक्ष द्यावं लागेल. कारण एका चुकीमुळे तुमचं नुकसान होईल आणि बँकेतून पैसेही कापले जातील. पेटीएम ॲपवर युजर्सना सर्व फीचर्स मिळत राहतील. इथे तुम्ही सहज रिचार्ज करू शकता, यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

टॅग्स :पे-टीएमगुगल पेफास्टॅगएचडीएफसी