Kuwait Rise Global Tenion : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, त्याचे गंभीर परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. कतारने 'एलएनजी' पुरवठ्यावर निर्बंध आणल्यानंतर आता कुवेतनेही तेल उत्पादनात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'होर्मुजच्या सामुद्रधुनी'मधील वाढता धोका लक्षात घेऊन कुवेतने हे पाऊल उचलले आहे.
कुवेतचा सुरक्षेसाठी 'उत्पादन कपाती'चा पवित्रासरकारी मालकीच्या 'कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशन'ने ७ मार्च रोजी स्पष्ट केले की, वाढत्या सुरक्षेच्या धोक्यांमुळे आणि जोखीम व्यवस्थापनाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कुवेतवर इराणकडून होणारे हल्ले आणि होर्मुजच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवर आलेले संकट यामुळे कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्यात आले आहे. कुवेत दररोज सुमारे २६ लाख बॅरल तेल उत्पादन करतो, त्यामुळे या कपातीचा जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होणार आहे.
होर्मुज सामुद्रधुनी: जागतिक अर्थव्यवस्थेची नसइराण आणि ओमान दरम्यान असलेली होर्मुजची सामुद्रधुनी ही जगातील २० टक्के तेल वाहतुकीसाठी वापरली जाते. युद्धामुळे या मार्गावर जहाजे चालवणे धोक्याचे ठरत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर ही परिस्थिती कायम राहिली, तर संयुक्त अरब अमिराती देखील उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. याआधीच इराकचे उत्पादन दिवसाला १५ लाख बॅरलने घटले असून कतारनेही आपला एलएनजी पुरवठा रोखला आहे.
वाचा - अनिल अंबानींना सीबीआयचा दणका! १०८५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
पाकिस्तानवर 'दुहेरी' संकटया युद्धाचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसताना दिसत आहे. पाकिस्तानकडे सध्या केवळ काही दिवसांचाच इंधन साठा उरला आहे.कतार पाकिस्तानची ९९ टक्के एलएनजीची गरज पूर्ण करतो. मात्र, कतारने पुरवठा रोखल्याने पाकिस्तानात गॅस संकट निर्माण झाले आहे.पाकिस्तान दररोज ४० ते ६० हजार बॅरल पेट्रोलियम उत्पादने कुवेत कडून आयात करतो. कुवेतच्या निर्णयामुळे पाकिस्तानला आता महागडे तेल खरेदी करावे लागणार आहे, जे त्यांच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेसाठी अशक्य आहे.
Web Summary : Kuwait's oil production cut amid Middle East tensions exacerbates Pakistan's energy woes. With limited fuel reserves and Qatar's LNG restrictions, Pakistan struggles with rising import costs, threatening its fragile economy.
Web Summary : मध्य पूर्व तनाव के बीच कुवैत ने तेल उत्पादन घटाया, जिससे पाकिस्तान का ऊर्जा संकट बढ़ गया है। सीमित ईंधन भंडार और कतर के एलएनजी प्रतिबंधों के साथ, पाकिस्तान आयात लागतों से जूझ रहा है, जो उसकी नाजुक अर्थव्यवस्था को खतरे में डाल रहा है।