Join us

Oyo च्या रितेश अग्रवालना 'कुंभमेळ्या'तून मिळालेली बिझनेसची आयडिया, सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:47 IST

OYO Founder Ritesh Agarwal: मुकेश अंबानींपासून गौतम अदानींपर्यंत जगभरातील दिग्गजांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात येऊन पवित्र स्नान केलं. दरम्यान, ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल देखील आपला मुलगा आर्यनसोबत संगमावर पोहोचले होते.

OYO Founder Ritesh Agarwal: मुकेश अंबानींपासून गौतम अदानींपर्यंत जगभरातील दिग्गजांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात येऊन पवित्र स्नान केलं. दरम्यान, ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल देखील आपला मुलगा आर्यनसोबत संगमावर पोहोचले होते. येथे त्यांनी महाकुंभाविषयीचा आपला वैयक्तिक अनुभव सांगितला आणि जुन्या दिवसांची आठवण करून देत हॉटेल व्यवसायाची कल्पना कुंभमेळ्यापासून मिळाल्याचं सांगितलं.

ओयोचे सीईओ रितेश अग्रवाल यांनी नुकताच आपला मुलगा आर्यनसोबत प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याला भेट दिली. अग्रवाल यांनी या नौका प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत ते दोन दशकांपूर्वीच्या महाकुंभ प्रवासाची आठवण सांगताना दिसत आहेत. "एकदा मी कुंभमेळ्यात आलो तेव्हा आम्ही एका नातेवाईकाच्या घरी थांबलो होतो. त्यावेळी मला जर आपण हॉटेलमध्ये थांबलो असतो तर इंडिपेंडंट असतो, स्वत:ची रुम असती तर अधिक चांगलं झालं असतं असं वाटलं. त्यावेळी हॉटेल किंवा अकोमोडेशनच्या व्यवसायात काम करण्याचा विचार मनात आला. आता इतक्या वर्षांनंतर यावर्षीच्या महाकुंभमेळ्यात लाखो लोक आमच्यासोबत येत आहेत, हे मला जाणवतंय. हे सर्व देवाच्या कृपेनंच शक्य झालं आहे, असंही ते म्हणाले.

रितेश अग्रवाल आणि त्यांची पत्नी गीतांशी सूद यांना २०२३ मध्ये पुत्ररत्न झालं. "त्याच्या आगमनानं आम्हाला आनंद झाला आहे. आमच्या छोट्या आर्यनला भेटा," असं त्यांनी त्यानंतर म्हटलं. सध्या ओयो आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार यावर्षी कंपनीचा आयपीओ लाँच होऊ शकतो.

टॅग्स :व्यवसायकुंभ मेळा