मुंबई : विदेशी गुंवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये शेअर बाजारात २२,८७२ कोटी रुपये गुंतवणूक केली. गेल्या तीन महिन्यांत एकूण ४५,४६७ कोटी गुंतवणूक शेअर बाजारात आल्याचे नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने म्हटले आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी आॅक्टोबरमध्ये १६,०३७ कोटी व सप्टेंबरमध्ये ६,५५८ कोटी गुंतवले होते. नोव्हेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी २५,२३० कोटी कंपन्यांचे शेअर्स व कर्जरोखे यात गुंतवले होते. कर सुधारणा, अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्ध संपण्याची शक्यता व सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणूकीचा निर्णय, यामुळे विदेशी गुंतवणूकदार ही गुंतवणूक करत आहे असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.
विदेशातील गुंतवणूकदारांचे शेअर बाजारात २२,८७२ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 00:03 IST