Join us
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार कर्मचाऱ्यांना 'नारळ' देणाऱ्या Oracle ने 'या' महिलेला दिले कोट्यवधीचे पॅकेज, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 16:27 IST

Who is Oracle New CFO Hillary Maxon: कोणत्या पदावर नियुक्ती? का दिले एवढे पॅकेज? जाणून घ्या...

Oracle New CFO Hillary Maxon: जगातील आघाडीच्या आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक Oracle सध्या चर्चेत आहे. अलिकडेच कंपनीने जगभरातून ३०, तर भारतातील तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. Ai मध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही कर्मचारी कपात केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ओरॅकलबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. कंपनीने हिलरी मॅक्सन यांची नवीन मुख्य वित्त अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने त्यांना अत्यंत आकर्षक वेतन पॅकेज दिल्यामुळे ही नियुक्ती चर्चेचा विषय ठरत आहे.

मोठे पॅकेज

ओरॅकलच्या माहितीनुसार, मॅक्सन यांना वार्षिक बेसिक पगार $९,५०,००० (सुमारे ₹७.८ कोटी) देण्यात आला आहे, तर परफॉर्मन्स बोनस $२.५ मिलियन (सुमारे ₹२०.७५ कोटी) असेल. परफॉर्मन्स निकष पूर्ण केल्यास त्यांची एकूण वार्षिक कमाई तब्बल $३.४५ मिलियन (सुमारे ₹२९ कोटी) पर्यंत जाऊ शकते.    

इक्विटी आणि दीर्घकालीन लाभ

मॅक्सन यांच्या पॅकेजमध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉक-आधारित प्रोत्साहन (equity) समाविष्ट आहे. यामध्ये एकूण इक्विटी ग्रँट $२६ मिलियन (सुमारे ₹२१५–₹२१६ कोटी) असेल. याशिवाय, कंपनी relocation साठी $२,५०,००० (सुमारे ₹२ कोटी) पर्यंत खर्च देणार आहे. या सर्व पॅकेजमुळे मॅक्सन यांची नियुक्ती सध्या चर्चेत आली आहे.

कंपनीत नेमकं काय करतील? 

मॅक्सन यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी पदभार स्वीकारला. त्या कंपनीच्या CEO सफ्रा कॅट्झ यांना रिपोर्ट करतील. त्या अशा काळात वित्तीय नेतृत्व सांभाळणार आहेत, जेव्हा ओरेकलला क्लाउड आणि AI सेवांची मोठी मागणी अनुभवायला मिळत आहे.

कोण आहेत मॅक्सन ?

हिलरी मॅक्सन यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी येथून पदवी आणि MBA चे शिक्षण घेतले आहे. याशिवाय, Schneider Electric मध्ये Executive Vice President आणि Group CFO म्हणून कामाचा दीर्घ अनुभवदेखील आहे. Schneider Electric ही कंपनी इलेक्ट्रिफिकेशन, ऑटोमेशन आणि डिजिटल सिस्टीम्स क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत असून, तिचे वार्षिक उत्पन्न $४५ बिलियन (सुमारे ₹३.७ लाख कोटी) पेक्षा जास्त आहे.

टेक क्षेत्रातील बदलते ट्रेंड

Oracle चा हा निर्णय जागतिक टेक इंडस्ट्रीतील मोठा ट्रेंड दर्शवतो. एका बाजूला खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी कपात, तर दुसऱ्या बाजूला लीडरशिप आणि AI/क्लाउड क्षेत्रात मोठी गुंतवणूक, यामुळे उच्च पदांवरील वेतन आणि सामान्य कर्मचाऱ्यांवरील परिणाम यातील तफावत चर्चेत आली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Oracle fires 12,000, hires CFO with multi-million dollar package.

Web Summary : Oracle, amidst layoffs to invest in AI, hired Hillary Maxon as CFO. Her package includes a $7.8 crore base salary, potential $20.75 crore bonus, and $215 crore in stock grants. Maxon, formerly at Schneider Electric, will lead Oracle's finances during cloud and AI expansion.
टॅग्स :माहिती तंत्रज्ञानअमेरिकाकर्मचारी कपातनोकरी