Join us

पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹२,००,००० ची FD केली तर २ वर्षानंतर किती रक्कम मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 10:04 IST

FD Calculator: पोस्ट ऑफिस आता विविध प्रकारच्या बँकिंग सेवाही पुरवते. पाहूया कोणती आहे ही स्कीम ज्यात मिळतोय अधिक परतावा.

FD Calculator: पोस्ट ऑफिस आता विविध प्रकारच्या बँकिंग सेवाही पुरवते. बचत खात्यांबरोबरच पोस्ट ऑफिसमध्ये एफडी खातंही उघडता येतं. पोस्ट ऑफिसमधील एफडीला टीडी (Time Deposit) म्हणतात. पोस्ट ऑफिसची टीडी ही बँकांच्या एफडीसारखीच असते, ज्यामध्ये तुम्हाला ठराविक वेळी ठराविक रक्कम मिळते. देशातील अनेक लोक कर वाचवण्यासाठी पत्नीच्या नावानं बचत खाती उघडतात.

याशिवाय उर्वरित घरांमध्ये महिलांच्या नावाने बचत खाती चालविली जातात. आज आपण येथे जाणून घेणार आहोत की जर तुम्ही पत्नीच्या नावावर २ वर्षांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील.

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा ₹५ लाख, मिळेल ₹२,२४,९७४ चं फिक्स व्याज; पाहा डिटेल्स

२ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के व्याज

पोस्ट ऑफिसमध्ये ४ वेगवेगळ्या कालावधीसाठी टीडी खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्ष, ३ वर्ष आणि ५ वर्षांसाठी टीडी खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७ टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के बंपर व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसटीडी स्कीममध्ये किमान एक हजार रुपये जमा करता येतात. जास्तीत जास्त डिपॉझिट लिमिट नाही. या योजनेत तुम्ही हवे तेवढे पैसे जमा करू शकता.

२ लाख रुपये जमा केल्यास किती पैसे मिळतील?

पोस्ट ऑफिसमध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांना समान व्याज मिळतं. आता स्त्री असो वा पुरुष, सामान्य नागरिक असो वा ज्येष्ठ नागरिक पोस्ट ऑफिस सर्वांना समान व्याज दिलं जातं. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये 2 वर्षांच्या टीडीमध्ये (एफडी) २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुमच्या पत्नीच्या खात्यात एकूण २,२९,७७६ रुपये जमा होतील. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या २,००,००० रुपयांव्यतिरिक्त २९,७७६ रुपयांच्या व्याजाचा समावेश आहे. पोस्ट ऑफिसच्या टीडी स्कीमवर ग्राहकांना गॅरंटीसह निश्चित व्याजही मिळतं, ज्यात कोणत्याही प्रकारचे चढ-उतार नसतात.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक