लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यंदाच्या दिवाळीत ऑनलाइनखरेदीची खरी जादू मेट्रो शहरांत नाही, तर छोट्या आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये दिसून आली आहे. या भागांमधून आलेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे ई-कॉमर्सला सणासुदीच्या हंगामात नवा बूस्टर मिळाला आहे. एकूण ऑनलाइन ऑर्डर्सपैकी तब्बल तीन-चतुर्थांश वाटा नॉन-मेट्रो शहरांचा ठरला असून, त्यात टियर-३ शहरांनी अर्ध्याहून अधिक योगदान दिले आहे.
लॉजिस्टिक्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म क्लिकपोस्टने ४.२५ कोटी शिपमेंट्सच्या केलेल्या विश्लेषणातून आढळले की, ई-कॉमर्सच्या वाढीला छोट्या शहरांतून बळ मिळत आहे. नवरात्रोत्सवाच्या आधीच्या आठवड्यात फॅशन ऑर्डर्समध्ये १४.३ टक्क्यांची वाढ झाली, तर करवा चौथमध्ये कॉस्मेटिक खरेदी फॅशनच्या दुप्पट झाली.
कॅश ऑन डिलिव्हरीवर भर : छोट्या शहरांतून येणाऱ्या ऑर्डर्समुळे मेट्रो शहरांतील ऑनलाइन खरेदीचा जोर कमी दिसतो. कॅश ऑन डिलिव्हरीवर अजूनही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. ५२% लोक टियर-३ शहरांतून कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट पद्धतीत प्राधान्याने वापरतात. ८.७% लोक घेतात सेम-डे डिलिव्हरीचा फायदा.
ई-कॉमर्समध्ये ‘भारत’चा दम
विभाग वाटा (%)टियर-३ शहरे ५०.७%टियर-२ शहरे २४.८%मेट्रो + टियर-१ २५.३%एकूण छोटी शहरे ७४.७%
Web Summary : E-commerce sees a boost from smaller cities during the festive season, with non-metro areas contributing three-quarters of online orders, Tier-3 cities leading. Cash on Delivery remains popular, especially in Tier-3 cities, while same-day delivery gains traction.
Web Summary : त्योहारी सीजन के दौरान छोटे शहरों से ई-कॉमर्स को बढ़ावा मिला, गैर-महानगर क्षेत्रों का ऑनलाइन ऑर्डर में तीन-चौथाई योगदान, टीयर-3 शहर आगे। कैश ऑन डिलीवरी अभी भी लोकप्रिय है, खासकर टीयर-3 शहरों में, जबकि सेम-डे डिलीवरी बढ़ रही है।