Join us

Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:13 IST

Swiggy Zomato Food Delivery: तुम्हीही ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यासाठी स्विगी, झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करता का? मग आता तुमचा खिसा अधिक रिकामा करावा लागू शकतो आणि तोही येत्या सणासुदीच्या काळात.

Swiggy Zomato Food Delivery: तुम्हीही ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यासाठी स्विगी, झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करता का? मग आता तुमचा खिसा अधिक रिकामा करावा लागू शकतो आणि तोही येत्या सणासुदीच्या काळात, जेव्हा ऑनलाइन फूडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं दिसून येतं. खरं तर, अलीकडेच जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत सरकारनं ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या डिलिव्हरी सेवेवर १८% जीएसटी जाहीर केला. त्याच वेळी, अनेक कंपन्यांनी कर लागू होण्यापूर्वीच प्लॅटफॉर्म फी वाढवून ग्राहकांना धक्का दिला आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरपासून डिलिव्हरी शुल्कावर जीएसटी लागू झाल्यानंतर, ऑनलाइन अन्न ऑर्डर करण्याचा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.

डिलिव्हरीवर १८% जीएसटी

३ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत जीएसटी सुधारणांशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यामध्ये, सुरुवातीपासून लागू केलेल्या ४ टॅक्स स्लॅबऐवजी, आता फक्त ५%-१८% चे दोन कर स्लॅब शिल्लक आहेत. त्याच वेळी, घरगुती वापरातील वस्तूंपासून ते टीव्ही-एसी, कार-बाईकपर्यंत सर्व गोष्टींच्या किमती कमी करण्याची घोषणा देखील करण्यात आली. त्याच वेळी, काही वस्तूंवर कराचा बोजा वाढवण्यात आला आहे किंवा नवीन कर लादण्यात आला आहे.

Stock Market ची मजबूत सुरुवात, सेन्सेक्स २३७ अंकांनी वधारला; निफ्टीतही तेजी, 'हे' शेअर्स सुस्साट

दरम्यान, जीएसटी कौन्सिलनं ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या डिलिव्हरी सेवेवर १८% कर लादला आहे, जो २२ सप्टेंबरपासून लागू होईल. अशा परिस्थितीत, ऑनलाइन फूड ऑर्डरिंग आणखी महाग होऊ शकतं. यापूर्वी ही सेवा कराच्या कक्षेबाहेर होती, जी आता सीजीएसटी कायद्याच्या कलम ९(५) अंतर्गत समाविष्ट करण्यात आलीये.

आणखी महाग होणार

पीटीआयच्या वृत्तानुसार, झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिन सारख्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मनी सणासुदीच्या आधी प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे, ज्यामुळे देशभरातील लाखो लोकांसाठी ऑनलाइन फूड ऑर्डर करणं महाग झालंय.

पीटीआयच्या वृत्तानुसार, स्विगीनं काही बाजारपेठांसाठी जीएसटीसह त्यांचं प्लॅटफॉर्म शुल्क १५ रुपये केलंय, तर झोमॅटोनं त्यांचे शुल्क १२.५० रुपये (जीएसटी वगळून) वाढवलं ​​आहे. इतकंच नाही तर फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आणखी एक मोठी कंपनी मॅजिकपिननंही व्यवसायावर जीएसटीचा मोठा परिणाम लक्षात घेता त्यांचं प्लॅटफॉर्म शुल्क १० रुपये प्रति ऑर्डर केलंय. २२ सप्टेंबरपासून त्यावर १८ टक्के जीएसटीचा परिणाम फूड ऑर्डर खर्चात आणखी वाढ होण्याच्या स्वरूपात दिसून येऊ शकतो. झोमॅटो युझर्ससाठी प्रति ऑर्डर सुमारे २ रुपये आणि स्विगी युझर्ससाठी २.६ रुपये वाढण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :स्विगीझोमॅटोव्यवसाय