Join us

जगाचा झाला वांदा! भारतात कांदा कवडीमाेल, परदेशात मात्र साेन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 08:57 IST

प्रचंड दरवाढीमुळे अनेक देशांमध्ये चिंता

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कांदा सध्या चर्चेत आहे. राज्यात कांद्याला अगदी कवडीमाेल भाव मिळत आहे; मात्र याच कांद्याला परदेशात साेन्याचा भाव आला आहे. भारतात कांद्याची किंमत काेसळली असताना अनेक देशांमध्ये तब्बल ७५० टक्क्यांनी कांदा महाग झाला आहे. फिलिपाईन्समध्ये कांद्याचा भाव २.५ हजार रुपये किलाेपर्यंत गेला आहे. भूकंपग्रस्त तुर्कीपासून पाकिस्तान, कजाकिस्तान इत्यादी देशांमध्ये कांदा जनतेला रडवित आहे.

जगभरात कांदा महाग हाेताेय आणि भारतात मात्र ताे शेतकऱ्यांना रडवताेय. गेल्या महिनाभरात भारतात कांद्याचे दर सरासरी ३० टक्क्यांनी घटले आहेत. तर जगातील अन्न टंचाईचे प्रतिनिधित्व कांदा करताेय. अनेक देशांमध्ये कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी दरवाढ दिसत आहे. अनेक देशांमध्ये जेवणातून कांदा हद्दपार झालेला दिसत आहे.

कशामुळे कांदा महागला?n युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या देशांमध्ये कांद्याचे उत्पादन खूप कमी झाले आहे. त्यातच तेथे दुष्काळाचाही फटका बसला आहे. n नेदरलॅंडसारख्या माेठ्या निर्यातदारामध्येही उत्पादन कमी झाले. याचा जगातील कांदा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. n पाकिस्तानात गेल्यावर्षी महापुराचा फटका बसला. याशिवाय कडाक्याच्या थंडीनेही मध्य आशियातील कांदा पिकाचे नुकसान केले आहे. 

कजाकिस्तान, किर्गीजस्तान, उजबेकिस्तान, ताजिकिस्तान, अजरबैजान, माेराेक्काे या देशांनी कांदा विक्रीवर मर्यादा घातल्या आहेत. बेलारुसने निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. 

भारतात कांद्यावर निर्यात बंदी नाहीकेंद्र सरकारने निर्यात बंदी केल्याचा आराेप विराेधकांनी केला हाेता; मात्र सरकारने ताे फेटाळला आहे. कांद्याची निर्यात सुरू असून केवळ बियाणांवर प्रतिबंध असल्याचे वाणिज्य मंत्री पीयूष गाेयल यांनी स्पष्ट केले.

१५-२०रुपये किलाे सरासरी दराने भारतात बहुतांश ठिकाणी कांदा विक्री हाेत आहे.

टॅग्स :कांदा