Join us

यंदा १,१४८ कोटी रुपयांची कांदा निर्यात घटली, निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 06:25 IST

१३ टक्के निर्यात घसरल्यामुळे निर्यातदारांच्या यादीमध्ये चीनने भारताला मागे टाकले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांना २०१९-२० या संपूर्ण आर्थिक वर्षात कांदा निर्यातबंदीचा प्रचंड फटका बसला आहे. वर्षभरात १० लाख ३३ हजार टन कांदा निर्यात कमी झाली असून, त्यामुळे १,१४८ कोटी १७ लाख रुपयांनी उलाढाल घसरली आहे. १३ टक्के निर्यात घसरल्यामुळे निर्यातदारांच्या यादीमध्ये चीनने भारताला मागे टाकले आहे.जगातील प्रमुख कांदा उत्पादक व निर्यात करणाºया देशांमध्ये भारताचा समावेश होतो. प्रत्येक वर्षी जगातील जवळपास ९० देशांमध्ये भारतामधून कांदा निर्यात केला जात असून, आखाती देशांमध्ये भारतीय कांद्याला विशेष मागणी आहे; परंतु २०१९-२० या संपूर्ण आर्थिक वर्षात केंद्र सरकारने वारंवार कांदा निर्यातबंदी केल्यामुळे त्याचा व्यापारावर परिणाम झाला असून, शेतकºयांना प्रचंड फटका बसला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये भारतामधून २१ लाख ८३ हजार टन कांदा विदेशात पाठविण्यात आला. या व्यापारातून तब्बल ३,४६८ कोटी ८७ लाख रुपयांची उलाढाल झाली होती. २०१९-२० या आर्थिक वर्षात फक्त ११ लाख ४९ हजार टन निर्यात झाली. पहिल्यांदाच १० लाख ३३ हजार टनची घसरण झाली. विदेश व्यापारातून २,३२० कोटी रुपयांची उलाढाल झाली. अगोदरच्या वर्षाच्या तुलनेमध्ये १,१४८ कोटी रुपयांनी उलाढाल घसरली. साहजिकच याचा फटका देशातील शेतकºयांनाही बसला आहे. निर्यातबंदीचा फटका उत्पादकांना बसलाच; परंतु जागतिक क्रमवारीमध्येही भारताला त्याचा फटका बसला आहे.भारतातून सर्वाधिक मागणी असणारे देशबांगलादेश, मलेशिया, यूएई, श्रीलंका, नेपाळ, सौदी अरब, कतार, कुवेत, ओमन, व्हिएतनाम या दहा देशांमध्ये सर्वाधिक कांदा निर्यात होते. एकूण ९० देशांमध्ये भारतामधून कांदा विक्रीसाठी पाठविला जातो.वर्षनिहाय कांदा निर्यातीचा तपशीलवर्ष निर्यात(टन) उलाढाल(कोटी)२०१७ - १८ १५८८९८५ ३०८८२०१८ - १९ २१८३७६६ ३४६८२०१९ - २० ११४९८९६ २३२०कांदा निर्यातबंदीचा फटका शेतकºयांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात कांदा कंटेनरमध्ये अडकून पडला आहे. शासनाने निर्यातबंदी रद्द करावी, अशी मागणी आम्ही केंद्र शासनाकडे केली आहे. - अशोक डक, सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :कांदा