Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:04 IST

...यानंतर, बीएसईवर शेअरचा भाव २.६२ टक्क्यांनी वधारून ५४.७० रुपयांवर पोहोचला. या निर्णयामुळे कंपनीची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि भविष्यातील विस्ताराला गती मिळेल, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे.

शेअर बाजारातील स्मॉलकॅप कंपनी ‘वन पॉइंट वन सोल्यूशन्स’च्या शेअरमध्ये मंगळवारी तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअर धारकांनी मोठे भांडवल उभारण्याच्या कंपनीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर, बीएसईवर शेअरचा भाव २.६२ टक्क्यांनी वधारून ५४.७० रुपयांवर पोहोचला. या निर्णयामुळे कंपनीची आर्थिक स्थिती बळकट होईल आणि भविष्यातील विस्ताराला गती मिळेल, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे.

कंपनीने १२ जानेवारी २०२६ रोजी नियामक फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्रमोटर्स आणि निवडक गुंतवणूकदारांना प्राधान्य आधारावर पूर्णपणे परिवर्तनीय वॉरंट जारी करण्यासाठी एक विशेष ठराव शेअरधारकांनी बहुमताने मंजूर केला आहे. एकूण २९.५६ लाख वैध मते पडली, यांपैकी २९.५५ लाख प्रस्तावाच्या बाजूने होते, तर फक्त ९०० विरोधात होते. कोणतेही अवैध मत नोंदवले गेले नाही.

या प्रस्तावांतर्गत कंपनी प्रत्येकी ५६ रुपये किमतीचे (५४ रुपये प्रीमियमसह) एकूण १.५ कोटी वॉरंट जारी करणार असून, या संपूर्ण इश्यूची साइज जवळपास ₹84 कोटी एवढी असेल. प्रत्येक वॉरंटचे १८ महिन्यांच्या आत एका इक्विटी शेअरमध्ये रूपांतर करता येईल. हे वॉरंट प्रवर्तक अक्षय छाबडा यांच्यासह अल महा इन्व्हेस्टमेंट फंड आणि क्राफ्ट इमर्जिंग मार्केट फंड यांसारख्या प्रमुख गुंतवणूकदारांना दिले जातील. सेबीच्या नियमांनुसार, वाटपाच्या वेळी २५ टक्के रक्कम भरावी लागेल आणि उर्वरित ७५ टक्के रक्कम शेअरमध्ये रूपांतरणाच्या वेळी द्यावी लागेल.

कंपनीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, वन पॉइंट वन सोल्यूशन्सने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरने २३० टक्के, तर पाच वर्षांत २००० टक्क्यांहून अधिक 'मल्टिबॅगर' परतावा दिला आहे. ताज्या निधी उभारणीमुळे कंपनीच्या विकासाला नवी उभारी मिळेल, असा विश्वास बाजार तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Smallcap Share Surges 2000%, Now Raising ₹84 Crore Capital

Web Summary : One Point One Solutions' share price jumped after shareholders approved raising ₹84 crore. The company will issue warrants convertible to equity shares, boosting financial strength and future growth. The stock has delivered multibagger returns, exceeding 2000% in five years.
टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजार