Join us

एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 09:23 IST

कर्मचाऱ्यास वेतनाचा १.६ दशलक्ष डॉलरचा धनादेश मिळाला. भारतीय रुपयांत ही रक्कम १४ कोटी रुपये इतकी होते.

न्यूयॉर्क : अमेरिकेतील मिशिगन राज्यातील वेन परगण्यात (काउंटी) एका कर्मचाऱ्यास तब्बल १४ कोटी रुपयांचे वेतन मिळाले. पेरोल विभागातील पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे हा प्रकार झाला असल्याचे समोर आले आहे.

कर्मचाऱ्यास वेतनाचा १.६ दशलक्ष डॉलरचा धनादेश मिळाला. भारतीय रुपयांत ही रक्कम १४ कोटी रुपये इतकी होते. वास्तविक या कर्मचाऱ्यास वेतनवाढ मिळाली होती. 

नवीन वेतनाची माहिती संगणकात भरली जात असताना पर्यवेक्षकाने मासिक दराच्या जागी ताशी दर टाकला. त्यामुळे त्याचे वेतन अव्वाच्या सव्वा वाढले. वाढीव वेतन मिळालेला कर्मचारी प्रामाणिक होता. त्याने ही माहिती पर्यवेक्षकास दिली.

गडबड होता होता वाचली

या चुकीस जबाबदार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले असून तिसऱ्या एकास निलंबित करण्यात आले आहे.

परगण्याचे कार्यकारी अधिकारी वॉरेन ईव्हान्स यांनी सांगितले की, कोणत्याही कारणाने या चुकीवर पांघरूण घातले जाऊ शकत नाही. असे व्हायलाच नको होते. मोठी गडबड होता होता वाचली.

टॅग्स :पैसाअमेरिका