Join us

ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:01 IST

Ola Electric Share Price: सोमवारी, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ झाली. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण?

Ola Electric Share Price: सोमवारी, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ झाली. यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत ४.७ टक्क्यांनी वाढून ४९.४० रुपयांवर पोहोचली. या वाढीमागील कारण नीति आयोगाशी संबंधित एक अहवाल आहे. हिंदू बिझनेस लाईनच्या वृत्तानुसार, नीति आयोग दुचाकी उत्पादक कंपन्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहे.

अहवालानुसार, नीति आयोगाचे अधिकारी हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर, ओला इलेक्ट्रिक, एथर आणि रिव्होल्टच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत इलेक्ट्रिक मोटारसायकलींना कसं प्रोत्साहन द्यायचं यावर चर्चा केली जाईल. सध्या, दुचाकी बाजारपेठेत स्कूटरचा एक तृतीयांश वाटा आहे. त्याच वेळी, या श्रेणीत ईव्हीचा वाटा १५ टक्के आहे. सरकारचा अंदाज आहे की २०३० पर्यंत इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री ८० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. त्याच वेळी, इलेक्ट्रिक मोटारसायकलींचा वाटा फक्त १० टक्के असेल. दोन्ही एकत्र करून इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा वाटा ३६ टक्के असू शकतो. जो सरकारच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे.

अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?

... तर समस्या वाढतील

यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की या दिवाळीत अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी केला जाईल. त्यानंतर कारवरील २८ टक्के जीएसटी १८ टक्के केला जाईल अशी बरीच चर्चा आहे. ऑटो उद्योगावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, जर हा निर्णय घेतला गेला तर त्याचा ईव्ही क्षेत्रावर परिणाम होईल. कारण जीएसटी कमी झाल्यामुळे पेट्रोल-डिझेलची वाहनं आणि ईव्ही वाहनांच्या किमतीत फारच कमी फरक राहिल.

जून तिमाही ओलासाठी चांगली नव्हती. या काळात कंपनीचा निव्वळ तोटा ४२८ कोटी रुपये होता. जो वार्षिक आधारावर २३ टक्क्यांनी जास्त आहे. जून तिमाहीत कंपनीचा EBITDA तोटा २३७ कोटी रुपये होता.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाशेअर बाजारगुंतवणूक