Join us

NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 10:31 IST

NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला. एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा प्राइस बँड १०२ ते १०८ रुपये प्रति शेअर होता.

NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ शेअर बाजारात लिस्ट झाला. शेअर बाजारात कंपनीची सुरुवात निराशाजनक होती. एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ बीएसईवर ३.३३ टक्क्यांच्या प्रीमियमसह १११.६० रुपये प्रति शेअरवर लिस्ट झाला. तर दुसरीकडे एनएसईवर कंपनीची लिस्टिंग १११.५० रुपये प्रति शेअरवर झाली. लिस्टिंग नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि शेअरला पहिल्याच दिवशी अपर सर्किट लागलं. ज्यानंतर बीएसईमध्ये शेअरचा भाव १२२.७५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. ही किंमत इश्यूप्राईजपेक्षा १३.६६ टक्के प्रीमिअम आहे.

एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा प्राइस बँड १०२ ते १०८ रुपये प्रति शेअर होता. कंपनीच्या एका लॉटमध्ये एकूण १३८ शेअर्स होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ९०४ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर ५ रुपयांची सूट दिली होती.

१९ नोव्हेंबर रोजी खुला झालेला आयपीओ

एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ १९ नोव्हेंबर रोजी खुला झाला. किरकोळ गुंतवणूकदारांना २२ नोव्हेंबरपर्यंत कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी होती. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीने शेअर्सचं वाटप केलं होतं. एनटीपीसी ग्रीन एनर्जीआयपीओची साईज १०,००० कोटी रुपये आहे. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून ९२.५९ कोटी नवे शेअर्स जारी केलेत.

हा आयपीओ १८ नोव्हेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांच्या सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून ३९६० रुपये उभे केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांना देण्यात आलेल्या ५० टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी केवळ ३० दिवसांचा आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार