Join us

NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:11 IST

NSDL IPO Listing: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (NSDL) शेअरनं बाजारात एन्ट्री घेतली. पाहा काय आहे शेअरची किंमत.

NSDL IPO Listing: नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (NSDL) शेअरनं बाजारात एन्ट्री घेतली. बुधवारी BSE वर NSDL चे शेअर्स १० टक्के प्रीमियमसह ८८० रुपयांना लिस्ट झाले. IPO मध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत ८०० रुपये होती. NSDL चा IPO १ ऑगस्ट २०२५ रोजी बोलीसाठी खुला होता आणि तो ४ ऑगस्टपर्यंत खुला होता. NSDL च्या आयपीओची एकूण साईज ४०११.६० कोटी रुपयांपर्यंत आहे.

लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये तेजी

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे (NSDL) शेअर्स लिस्टिंगनंतर आणखी वाढले. कंपनीचे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक वाढून ९२० रुपयांवर पोहोचलेत. NSDL ची सुरुवात २०१२ मध्ये झाली. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ही SEBI-नोंदणीकृत मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्था आहे. NSDL सिक्युरिटीज डिपॉझिटरी म्हणून काम करते. NSDL सिक्युरिटीजच्या वाटप आणि मालकी हस्तांतरणाचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवते. याशिवाय, NSDL ट्रेड सेटलमेंट, ऑफ-मार्केट ट्रान्सफर, सिक्युरिटीजची प्लेजिंग आणि कॉर्पोरेट अॅक्शन यासारख्या डिपॉझिटरी सेवा देते.

रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या

४१ पट सबस्क्रिप्शन

एनएसडीएलचा आयपीओ एकूण ४१.०२ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ७.७६ पट सबस्क्रिप्शन मिळालं. त्याच वेळी, कर्मचारी श्रेणीत १५.३९ पट बोली लावण्यात आल्या. एनएसडीएल आयपीओला गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) श्रेणीत ३४.९८ पट सबस्क्राइब मिळाला आहे. त्याच वेळी, पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीला १०३.९७ पट सबस्क्रिप्शन मिळालं.

एनएसडीएल आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी बेट्स लावू शकणार होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये १८ शेअर्स आहेत. म्हणजेच, किरकोळ गुंतवणूकदारांना १ लॉटसाठी १४,४०० रुपये गुंतवावे लागले. एनएसडीएल आयपीओमध्ये एकूण ५,०१,४५,००१ शेअर्स ऑफर करण्यात आले होते. शेअरची फेस व्हॅल्यू २ रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार