Join us

NPS Rules : 15 जुलैपासून बदलणार गुंतवणुकीचे नियम; लगेच जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:24 IST

NPS Rules : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (PFRDA)  वतीने एक परिपत्रक जारी करून गुंतवणूकदारांना एनपीएसमधील जोखीम प्रोफाइलबद्दल माहिती देण्यासाठी नियम देण्यात आले होते.

नवी दिल्ली : तुम्हीही एनपीएसमध्ये (NPS) गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या महत्त्वाची आहे. येत्या 15 जुलैपासून नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये (NPS) गुंतवणूक करणे पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या (PFRDA)  वतीने एक परिपत्रक जारी करून गुंतवणूकदारांना एनपीएसमधील जोखीम प्रोफाइलबद्दल माहिती देण्यासाठी नियम देण्यात आले होते. त्याचा उद्देश गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढवणे हा होता.

यासोबतच स्वतःच्या गुंतवणुकीचे निर्णय स्वतः घेऊ शकतात आणि जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतात, याचीही गुंतवणूकरांसाठी जागरुकता करणे होता. परिपत्रकानुसार, आता पेन्शन फंडाला त्रैमासिक आधारावर 15 दिवसांच्या आत वेबसाइटवर सर्व योजनांचे जोखीम प्रोफाइल शेअर करावे लागतील. पीएफआरडीएने गुंतवणूकदारांना जोखीम प्रोफाइलची माहिती देण्यासाठी नियम केले आहेत. या नियमांनुसार, कमी, कमी ते मध्यम, मध्यम, मध्यम उच्च, उच्च आणि अतिशय उच्च असे सहा स्तर तयार केले आहेत. 

विशेष बाब म्हणजे जोखीम प्रोफाइलचे विश्लेषण तिमाही आधारावर केले जाईल. टियर-1 आणि टियर-2, अॅसेट क्लास इक्विटी (ई), कॉर्पोरेट डेट (सी), सरकारी सिक्युरिटीज (जी) आणि स्कीम ए असणाऱ्या पेन्शन फंड योजनांची जोखीम प्रोफाइलबद्दल सांगणे आवश्यक आहे. पीएफआरडीएच्या परिपत्रकात असेही म्हटले आहे की, इस्‍ट्रूमेंटच्या कंझरव्हेटिव्ह रेटिंगच्या (Conservative Credit Rating) आधारावर 0 ते 12 चे क्रेडिट जोखीम मूल्य दिले जाईल. 0 क्रेडिट मूल्य हाय क्रेडिट क्वालिटीला दर्शवते, तर 12 क्रेडिट मूल्य सर्वात कमी क्रेडिट क्वालिटीला दर्शवते.

अशी घ्या रिस्क प्रोफाइलिंगची माहितीप्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या 15 दिवसांत 'Portfolio Disclosure' या कलमांतर्गत संबंधित पेन्शन फंडाच्या वेबसाइटवर जोखीम प्रोफाइलची माहिती दिली जाईल. 31 मार्चपर्यंत वार्षिक आधारावर योजनांची जोखीम स्तर आणि वर्षभरात किती वेळा जोखीम स्तर बदलला आहे, हे पेन्शन फंडाच्या वेबसाइटवर प्रकाशित केले जाईल.

टॅग्स :पैसागुंतवणूकव्यवसायबँक