Join us

आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:04 IST

इंडसइंड बँकेच्या (IndusInd Bank) अंतर्गत लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी समोर आल्यानं बँकेच्या प्रतिमेवर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

इंडसइंड बँकेच्या (IndusInd Bank) अंतर्गत लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी समोर आल्यानं बँकेच्या प्रतिमेवर आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तीन तिमाहीत ६७४ कोटी रुपयांची रक्कम चुकीच्या पद्धतीनं व्याज उत्पन्नाच्या रुपात (interest income) दाखवण्यात आल्याची माहिती बँकेनं गुरुवारी शेअर बाजाराला दिली. ही संपूर्ण रक्कम १० जानेवारी २०२५ रोजी रिवर्स करण्यात आली, पण त्यापूर्वीच ती बॅलन्स शीटचा भाग बनली होती.

बँकेच्या लेखापरीक्षण समितीला समितीला मायक्रोफायनान्स पोर्टफोलिओमधील अनियमितता दर्शविणारी तक्रार मिळाल्यानंतर ही चूक उघडकीस आली. यानंतर, इंडसइंड बँकेच्या ऑडिट टीमने 'other assets' आणि 'other liabilities' खात्यांचा आढावा घेतला, ज्यामध्ये अधिक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?

बँकेच्या ८ मे च्या अहवालानुसार, ५९५ कोटी रुपयांची ही रक्कम 'अनव्हेरिफाईड' असल्याचं आढळून आलं, जी नंतर जानेवारी २०२५ मध्ये दोन्ही पक्षांनी बॅलन्स करून समायोजित करण्यात आली. याचा अर्थ असा की ही रक्कम कोणत्याही वैध पुष्टीशिवाय वर्षानुवर्षे बँकेच्या बॅलन्स शीटमध्ये नोंदवण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचा आढावा घेतला जात आहे आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं बँकेनं म्हटलंय.

याशिवाय, अंतर्गत नियंत्रण प्रणाली (internal controls) मजबूत करण्यासाठी देखील पावलं उचलली जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाला अधिक महत्त्व आलं जेव्हा EY (अर्न्स्ट अँड यंग) ला देखील या तपासात समाविष्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली. बँकेच्या मायक्रोफायनान्स पोर्टफोलिओमध्ये सुमारे ₹६०० कोटींच्या अनियमिततेचा संशय असल्यानं EY ला चौकशीसाठी बोलावण्यात आलं. डिसेंबर २०२४ च्या तिमाहीत, बँकेचा एमएफआय पोर्टफोलिओ ₹३२,५६४ कोटी होता, जो एकूण लोन बुकच्या ९% होता.

टॅग्स :बँक