Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता नव्या पद्धतीनं महागाई मोजणार मोदी सरकार; Netflix, ओला, उबेरसारख्या खर्चाचाही समावेश होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:40 IST

Inflation Count: भारतात महागाई मोजण्याच्या पद्धतीत आता मोठा बदल होणार आहे. सरकार ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) नवीन आधारभूत वर्षासह सादर करण्याच्या तयारीत आहे. पाहा काय काय बदल होणार.

Inflation Count: भारतात महागाई मोजण्याच्या पद्धतीत आता मोठा बदल होणार आहे. सरकार ग्राहक मूल्य निर्देशांक (CPI) नवीन आधारभूत वर्षासह सादर करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत महागाईची गणना २०१२ हे आधारभूत वर्ष मानून केली जात होती, परंतु गेल्या दशकात लोकांची जीवनशैली आणि खर्च करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे सरकारने आता २०२४ हे नवीन आधारभूत वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन निर्देशांक १२ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल आणि त्याच दिवशी जानेवारी २०२६ चे महागाईचे आकडे नवीन संरचनेनुसार जाहीर केले जातील.

वस्तू आणि सेवांच्या संख्येत वाढ

नवीन निर्देशांकात समाविष्ट असलेल्या वस्तू आणि सेवांची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. सध्या या यादीत सुमारे २९९ वस्तू आहेत, ज्यांची संख्या आता ३५८ होईल. यामुळे महागाईची गणना अधिक सविस्तर आणि वास्तववादी खर्चाच्या जवळ जाणारी असेल. रिझर्व्ह बँकेला व्याजाचे दर ठरवण्यासाठी आता अधिक अचूक आकडेवारी उपलब्ध होईल.

चांदी १ लाख रुपयांनी घसरली, सोनं ३३ हजारांनी आपटलं; काय आहे सोन्या-चांदीचा भाव?

ई-कॉमर्स आणि आधुनिक डेटा संकलन

आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धतीतही आधुनिक बदल करण्यात आले आहेत. आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरूनही किमतींची माहिती घेतली जाईल. हवाई भाडे, विजेचे दर आणि ऑनलाइन सेवांचे दर अधिक नियमितपणे रेकॉर्ड केले जातील, ज्यामुळे आकडेवारीची विश्वासार्हता वाढेल.

ओटीटी आणि गॅजेट्सचाही समावेश

डिजिटल युगातील बदलांना या निर्देशांकात स्थान देण्यात आले आहे. आता स्मार्टफोन, वायरलेस इअरफोन, फिटनेस बँड यांसारख्या आधुनिक वस्तू महागाईच्या गणनेत समाविष्ट केल्या जातील. याशिवाय, नेटफ्लिक्स (Netflix) सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि इतर डिजिटल सबस्क्रिप्शन सेवांचाही यात समावेश असेल.

कालबाह्य वस्तू बाहेर आणि नवीन सेवांची एन्ट्री

या नवीन पद्धतीत उबर (Uber) आणि ओला (Ola) सारख्या टॅक्सी सेवा, ऑनलाइन शॉपिंग आणि आंतरराष्ट्रीय हवाई भाड्याचा समावेश असेल. तसेच ग्रामीण भागातील घरांचं भाडंही पहिल्यांदाच मोजले जाणार आहे. दुसरीकडे, व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर (VCR) किंवा ऑडिओ कॅसेट यांसारख्या आता वापरात नसलेल्या वस्तू या सूचीतून हटवण्यात आल्या आहेत.

खाद्यपदार्थांचा भार कमी होणार

एक महत्त्वाचा बदल म्हणजे निर्देशांकातील खाद्यपदार्थांच्या हिशोबात करण्यात आला आहे. जुन्या निर्देशांकात खाद्य आणि पेय पदार्थांचा वाटा ४६ टक्के होता, जो आता कमी करून ३६-३७ टक्क्यांच्या आसपास आणला जाणार आहे. यामुळे केवळ भाजीपाला किंवा धान्याच्या किमतीतील चढ-उतारांमुळे महागाईचे आकडे अवाजवी बदलणार नाहीत. सेवा क्षेत्र आणि इतर वस्तूंना आता अधिक महत्त्व दिल्याने महागाईचे चित्र अधिक संतुलित दिसेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Modi Government to Measure Inflation Differently, Including Netflix, Ola, Uber Costs

Web Summary : India's inflation calculation changes with a new base year, 2024, effective February 2026. Expanded goods/services, e-commerce data, OTT, gadgets included. Food's weight reduces, balancing the index. Uber, Ola, rural rent added; obsolete items removed for accuracy.
टॅग्स :महागाईसरकार