Join us

आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:20 IST

Meta AI Layoffs: मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच त्यांच्या "AI सुपरइंटेलिजन्स" प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्स खर्चून एक मोठी टीम तयार केली होती, पण आता कंपनी त्याच टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे.

Meta AI Layoffs: मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच त्यांच्या "AI सुपरइंटेलिजन्स" प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्स खर्चून एक मोठी टीम तयार केली होती, पण आता कंपनी त्याच टीममधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली जात आहे. मेटाच्या AI डिव्हिजनमधून सुमारे ६०० कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे, ज्याला कंपनी 'प्रभावशीलता वाढवण्याचं' पाऊल असल्याचे सांगत आहे.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, मेटाची AI सुपरइंटेलिजन्स लॅब या आठवड्यात सुमारे ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करेल. ही कर्मचारी कपात मेटाने ॲपल, ओपनएआय आणि ॲन्थ्रॉपिक सारख्या प्रतिस्पर्धकांकडून उच्च दर्जाच्या प्रतिभावान लोकांना आकर्षित करून आक्रमकपणे भरती केल्यानंतर काही महिन्यांनी होत आहे.

बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स

२२ ऑक्टोबर रोजी छाटणीची घोषणा

या कर्मचारी कपातीची घोषणा कंपनीच्या आत २२ ऑक्टोबरला करण्यात आली. मेटाचे चीफ AI ऑफिसर अलेक्झांडर वांग यांनी सांगितलं, “टीमचा आकार कमी केल्यामुळे निर्णय घेण्यासाठी कमी संवादाची गरज भासेल आणि प्रत्येक व्यक्ती जास्त जबाबदारी पार पाडू शकेल.” २२ ऑक्टोबर रोजी अंतर्गतरीत्या घोषित केलेल्या या कपातीचा उद्देश "कार्यक्षमता वाढवणे आणि नोकरशाही कमी करणं" असल्याचंही ते म्हणाले.. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, वांग यांनी मेमोमध्ये लिहिलंय "आमच्या टीमचा आकार कमी केल्यानं, निर्णय घेण्यासाठी कमी चर्चेची आवश्यकता असेल आणि प्रत्येक व्यक्ती जास्त जबाबदारी पार पाडू शकेल."

TBD लॅबचे कर्मचारी सुरक्षित

विशेष म्हणजे, मेटाने स्थापन केलेली नवीन टीबीडी लॅब, ज्यात सर्वाधिक वेतन घेणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांपैकी बरेच जण समाविष्ट आहेत, ती अजूनही सुरक्षित आहे. कंपनीनं प्रभावित कर्मचाऱ्यांना इतर विभागांमधील पदांसाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित केलं आहे आणि म्हटलंय आहे की ती प्रमुख AI पदांसाठी निवडक नियुक्त्या सुरू ठेवेल.

ही छाटणी द वॉल स्ट्रीट जर्नलच्या पूर्वीच्या एका रिपोर्टनंतर झाली आहे ज्यात, मेटाने ऑगस्टमध्ये AI मधील नियुक्त्या थांबवल्या होत्या, ज्याला कंपनीने नंतर मूलभूत संघटनात्मक नियोजन म्हणून संबोधले आहे, असं सांगण्यात आलं होतं.

कंपनीनं कथितरित्या आपल्या सुपर इंटेलिजन्स प्रयत्नांना गती देण्यासाठी वांग यांच्या नेतृत्वाखालील डेटा लेबलिंग स्टार्टअप, स्केल एआय मध्ये १.२ लाख कोटी रुपये ($१४.३ अब्ज) गुंतवले आहेत. रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की मेटानं स्पर्धकांकडून AI तज्ज्ञांना आकर्षित करण्यासाठी ८०० कोटी रुपयांपर्यंत वेतन पॅकेज देऊ केले होते. ही कर्मचारी कपात एक पुनर्रचनेचं पाऊल असल्याचं मेटाचं म्हणणं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Meta AI Layoffs: Zuckerberg's AI Team Faces Job Cuts

Web Summary : Meta is cutting 600 AI division jobs after heavy investment. Despite aggressive hiring, a restructuring aims to improve efficiency. The cuts follow a hiring freeze and huge investments in AI talent and infrastructure. TBD lab is spared.
टॅग्स :मेटाआर्टिफिशिअल इंटेलिजन्सनोकरी