Airtel Investment In NBFC: देशातील नामांकित टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आता केवळ मोबाईल आणि इंटरनेट सेवांपुरती मर्यादित राहणार नाही. कंपनीनं आपल्या 'एअरटेल मनी' या नवीन नॉन-बैंकिंग फायनान्शिअल कंपनीमध्ये (NBFC) आगामी काही वर्षांत २०,००० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय. या गुंतवणूकीतील ७०% वाटा कंपनी स्वतः उचलणार आहे, तर उर्वरित रक्कम त्यांची प्रवर्तक कंपनी भारती एंटरप्रायझेसकडून येईल. एअरटेलच्या मते, हे नवीन फायनान्शिअ युनिट त्यांच्या डिजिटल ताकदीचा, ५०० पेक्षा जास्त डेटा सायंटिस्टच्या टीमचा आणि मजबूत ऑपरेशनल अनुभवाचा फायदा घेऊन देशभरात आर्थिक सेवांचा विस्तार करेल.
कसं असेल व्यवसायाचं स्वरूप?
एअरटेल मनीला १३ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) नोंदणी प्रमाणपत्र मिळालं आहे. यासह, त्यांना 'टाइप-II नॉन-डिपॉझिट' स्वीकारू न शकणारी NBFC म्हणून काम करण्याची मंजुरी मिळाली आहे. ही युनिट कंपनीच्या डिजिटल लेंडिंग आणि क्रेडिट डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म म्हणून कार्य करेल. भारती एअरटेलची उपकंपनी एअरटेल पेमेंट्स बँक आधीच डिजिटल प्रीपेड वॉलेट चालवते, परंतु त्यांना कर्ज देण्याची परवानगी नाही. आता एअरटेल मनी कायदेशीररित्या कर्ज, मायक्रोक्रेडिट उत्पादनं आणि स्ट्रक्चर्ड फायनान्शिअल सोल्युशन्स देऊ शकेल, मात्र ही संस्था लोकांकडून ठेवी म्हणजेच डिपॉझिट स्वीकारू शकणार नाही.
गेल्या दोन वर्षांत एअरटेलनं एक मजबूत क्रेडिट इंजिन आणि लेंडिंग सर्व्हिस प्लॅटफॉर्म (LSP) तयार केला आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आतापर्यंत ९,००० कोटी रुपयांहून अधिक कर्जाचे वितरण करण्यात आलंय. नवीन NBFC या प्लॅटफॉर्मचा वापर करेल, परंतु कामकाजात स्पष्टता राहावी यासाठी दोन्ही संस्थांचे ऑपरेशन्स वेगळे ठेवले जातील.
"गेल्या दोन वर्षांतील एलएसपी प्लॅटफॉर्मचं यश हे तंत्रज्ञान, डेटा आणि ग्राहकांचा विश्वास यांचा वापर करून राष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडण्याच्या कंपनीच्या क्षमतेचे प्रतीक आहे. एअरटेलनं देशातील सर्वात विश्वसनीय आणि स्केलेबल डिजिटल क्रेडिट इंजिनपैकी एक तयार केलं असल्याची प्रतिक्रिया भारती एअरटेलचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरमन गोपाळ विट्टल यांनी दिली.
Web Summary : Airtel is investing ₹20,000 crore in its NBFC, Airtel Money, expanding its financial services. RBI approved, it will offer loans and credit via its digital platform, separate from Airtel Payments Bank. Airtel's lending platform has already facilitated ₹9,000 crore in loans, showcasing its digital credit engine.
Web Summary : एयरटेल अपने एनबीएफसी, एयरटेल मनी में ₹20,000 करोड़ का निवेश कर रहा है, जिससे वित्तीय सेवाओं का विस्तार हो रहा है। आरबीआई द्वारा अनुमोदित, यह एयरटेल पेमेंट्स बैंक से अलग अपने डिजिटल प्लेटफॉर्म के माध्यम से ऋण और क्रेडिट की पेशकश करेगा। एयरटेल के ऋण मंच ने पहले ही ₹9,000 करोड़ के ऋण की सुविधा दी है, जो इसके डिजिटल क्रेडिट इंजन को दर्शाता है।