noel tata joins RTET : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४ मध्ये निधन झाले. यानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्या खांद्यावर टाटा समूहाची जबाबदारी देण्यात आली. नोएल टाटा यांनी सूत्र हाती घेत समूहात अनेक नवीन बदल केले. यामध्ये रतन टाटा यांनी सुरू केलेल्या काही परंपराही खंडीत झाल्या आहेत. यामध्ये आता आणखी नवीन बदलाची भर पडली आहे. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष असलेले नोएल टाटा आता रतन टाटा एंडोमेंट ट्रस्टच्या (RTET) बोर्डात सामील झाले आहेत. त्यांच्यासोबत रतन टाटा यांच्या सावत्र बहिणी असलेल्या शिरीन आणि दिना जिजीभॉय यांचीही ट्रस्टमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यमान विश्वस्त प्रमित झवेरी आणि दारियस खंबाटा यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. याशिवाय टाटा समूहाचे आणखी २ अधिकारी आर. आर. शास्त्री आणि जमशेद पोंचा यांचाही ट्रस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. या नियुक्त्यांनंतर, डॅरियस खंबाट्टा यांनी RTET बोर्डाचा राजीनामा दिला आहे.
रतन टाटा यांचा वारसारतन टाटा यांनी त्यांच्या मालमत्ता आणि धर्मादाय कामांसाठी हा ट्रस्ट तयार केला होता. हा ट्रस्ट त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करेल आणि भविष्यात धर्मादाय कामांसाठी निधी उभारेल. रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रानुसार उच्च न्यायालयाने मृत्युपत्र मंजूर केल्यावर त्यांच्या मालमत्तेचे वितरण सुरू होईल. ही प्रक्रिया सुमारे ६ महिने चालण्याची शक्यता आहे. रतन टाटा यांच्या सावत्र बहिणी असलेल्या शिरीन आणि दिना जिजीभॉय याही त्यांच्या मृत्यूपत्राच्या अंमलबजावणी करणाऱ्या आहेत. कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लाभार्थ्यांना संस्थांमध्ये पदे ठेवण्यापासून रोखण्यासाठी इच्छापत्रात कोणतेही बंधने नाहीत.
ट्रस्ट आणि एंडॉवमेंट फंडाचे महत्त्वरतन टाटा एंडॉवमेंट फाउंडेशन (RTEF) ही सेक्शन ८ कंपनी आहे, जी धर्मादाय कार्यांवर लक्ष केंद्रित करते. त्याच वेळी, RTET एक खाजगी ट्रस्ट असून जो भारतीय न्यास कायदा, १८८२ अंतर्गत कार्य करतो. कायदेतज्ज्ञांच्या मते, एंडोमेंट फंड हे एक आर्थिक साधन आहे, जे गुंतवणुकीद्वारे भांडवल वाढवते आणि धर्मादाय कार्यांसाठी उत्पन्न मिळवते. ट्रस्ट ही एक कायदेशीर रचना आहे जी मालमत्तेचे व्यवस्थापन करते आणि हे सुनिश्चित करते की मालमत्तेचा उपयोग धर्मादाय उद्दिष्टांनुसार केला जातो.