Join us

ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:33 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. मात्र, एक कंपनी अशी आहे, जिच्यावर ट्रम्पच्या टॅरिफचा कोणताही परिणाम झालेला नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. मात्र, एक कंपनी अशी आहे, जिच्यावर ट्रम्पच्या टॅरिफचा कोणताही परिणाम झालेला नाही. आम्ही Cian Agro Industries & Infrastructure बद्दल बोलत आहोत.

सोमवारी या कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागले. ५ टक्क्यांच्या वाढीनंतर बीएसईमध्ये हा मल्टीबॅगर स्टॉक २०२३.२० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. ही कंपनीची विक्रमी उच्च (Record High) पातळी देखील आहे. या कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १६५.६० रुपये आहे आणि कंपनीचे बाजार भांडवल (Market Cap) ५६६२.११ कोटी रुपये आहे.

रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक

१ महिन्यात पैसा दुप्पट

Cian Agro Industries & Infrastructure ने गुंतवणूकदारांचे पैसे केवळ १ महिन्यातच दुप्पट केले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सचा भाव १७४ टक्के वाढला. तर २ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३७५ टक्के वाढ झाली आहे. ६ महिन्यांत या मल्टीबॅगर स्टॉकचा भाव ४६६ टक्क्यांनी तर एका वर्षात Cian Agro Industries & Infrastructure च्या शेअर्सच्या किमतीत ११२१ टक्के वाढ झाली आहे. २ वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक ४५५२ टक्के वाढला. तर, ३ वर्षांत पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे ३६४६ टक्के वाढले आहेत. ५ वर्षांत गुंतवणूकदारांना ६८२८ टक्के तेजीचा फायदा झाला आहे.

१ ऑक्टोबरपासून ट्रेडिंग विंडो बंद राहणार

कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, त्यांची ट्रेडिंग विंडो १ ऑक्टोबरपासून पुढील काही दिवस बंद राहील. कंपनीच्या तिमाही निकालांच्या घोषणेनंतर ४८ तासांपर्यंत शेअर्सची खरेदी आणि विक्री करता येणार नाही. कंपनीने स्वतंत्रपणे दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, तिमाही निकालांच्या तारखेची घोषणा नंतर केली जाईल.

पहिल्या तिमाहीतील कामगिरी

Cian Agro Industries & Infrastructure चा महसूल (Revenue) पहिल्या तिमाहीत ५११ कोटी रुपये राहिला. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा महसूल १७.५० कोटी रुपये होता. म्हणजेच, वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात २८२० टक्क्यांची (२८२०%) वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Cian Agro stock defies Trump tariffs, delivers 1121% return!

Web Summary : Despite market downturns, Cian Agro Industries & Infrastructure's stock soared, hitting record highs. Shares doubled in a month, with a staggering 1121% yearly return. Trading window closes October 1st. First quarter revenue jumped 2820% year-over-year.
टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक